जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिशा सालियान प्रकरणाची चौकशी करा, शिंदे गटाने उकरला मुद्दा, आदित्य ठाकरेंसह विरोधकांचा गोंधळ

दिशा सालियान प्रकरणाची चौकशी करा, शिंदे गटाने उकरला मुद्दा, आदित्य ठाकरेंसह विरोधकांचा गोंधळ

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 22 डिसेंबर : दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या पुन्हा एकदा उकरण्यात आला आहे. शिंदे गटाने दिशा सालियान प्रकरणाची चौकशीबाबत मुद्दा उपस्थितीत केला. भाजपचे आमदार नितेश राणेंनीही आक्रमक मागणी केली. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी थांबवले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला. आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. (सुशांत प्रकरणी राहुल शेवाळेंनी घेतलं आदित्य ठाकरेंचं नाव, मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान, म्हणाले…) दिशा सालियानचा मृत्यू कशामुळे झाला, तिने आत्महत्या केली की तिला इमारतीवरून खाली फेकले आहे का? दिशा आणि सुशांत यांच्यामध्ये फोनवर संवाद झाला आहे का? याची तपशील उघड झाली नाही. दिशाने काही तरी माहिती पोहोचवली, त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी सीबीआयने अद्याप कोणताही रिपोर्ट दिला नाही. यात काही तरी तथ्य आहे, दिशाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अजून समोर आला नाही. तिच्या सोबत त्यावेळी कोणकोण होतं, याची माहिती समोर आली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोगावले यांनी केली. (सुशांत सिंह राजपूत प्रकरणात AU म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंचा लोकसभेत दावा) दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज सकाळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड यांच्यासह अन्य आमदार हे ये ‘AU, AU कौन है’ असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या आमदारांनी श्रीखंडाचे डब्बे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात