मुंबई, 22 डिसेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत धक्कादायक दावा केला आहे. या प्रकरणावर संभ्रम आहे, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे संकेत दिले आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून वाद पेटण्याची चिन्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना सगळ्यात मोठा धक्का दिला आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्वाक्षरी करणाऱ्या जामीनदारालाच शिंदेंनी त्यांच्या पक्षात घेतलं आहे. भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाा आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी राहुल शेवाळे यांच्या दावावर प्रतिक्रिया दिली. राहुल शेवाळे लोकसभेत काय म्हणाले, या सगळ्या वादावर संभ्रम आहे, या प्रकरणावर योग्य ती माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. तसंच, नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी आणि सुनिल पाटील यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. त्यांचे मनापासून स्वागत आहे. आमच्या भूमिकेला समर्थन अनेकांनी दिले. आमच्यावर लोकं विश्वास दाखवत आहे. ही सगळी आमची जिवा भावाची माणसे आहेत. आपला एकच अजेंडा सर्व सामान्यांना न्याय देणे. कोण काय बोलेल याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. काम करतो म्हणून ४५०० ग्रामपंचायती निवडणून आणल्या ही कामाची पोच पावती आहे. आपण जे काम करतोय यामुळे लोकांच्या छातीत धडकी बसलीये पाया खालची वाळू सरकली आहे. भाऊ आणि सुनिल यांनी जो विश्वास दाखवला त्याला कधी तडा जावू देणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काय म्हणाले होते राहुल शेवाळे लोकसभेत? सुशांत आणि दिशा सालियान यांच्या फोनमध्ये काय बोलणं झालं होतं? तिचा लॅपटॉप आणि मोबाईल काढून का घेतला? रिया चक्रवर्तीचा मोबाईल तपासला का, तिच्या मोबाईलमध्ये AU हा नंबर सेव्ह होता. त्यावर 44 फोन आले होते, AU ला अनन्या उद्धव असं सांगितलं आहे. पण बिहार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा आदित्य आणि उद्धव ठाकरे असं नाव समोर आलं होतं, असा दावाच शेवाळे यांनी केला आहे. मुंबईमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा कारवाई करते तेव्हा हायप्रोफाईल प्रकरणातच हस्तक्षेप करत असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी 3 स्तरावर चौकशी झाली होती. सीबीआय, मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनी चौकशी केली होती. पण, यामध्ये अजूनही काही प्रश्न आहे. सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला आहे? अशी विचारणा राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.