नागपूर, 29 जुलै: जगभरात 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. नागपूर शहरासह विदर्भाच्या परिघात मोठ्या प्रमाणात व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य आहेत. त्यामुळेच नागपूर शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. वाघांच्या संख्या आणि त्यांचा अधिवास वाढवा यासाठी शासनदरबारी अनेक उपाययोजनांचा दावा केला जात असला तरी त्यात समाधानकारक यश आल्याचे म्हणता येणार नाही. कारण गेल्या 5 वर्षातील वाघांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या काळात राज्यात तब्बल 24 वाघांची शिकाल झाली असून 115 वाघांचा मृत्यू झाला आहे. 24 वाघांची झाली शिकार महाराष्ट्रात गेल्या 2018 ते 2022 या पाच वर्षाच्या कालावधी ततब्बल 115 वाघांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे याच कालावधीत तब्बल 24 वाघांची शिकार करण्यात आली तर अपघात आणि विद्युत प्रवाहामुळेही 22 वाघांचा बळी गेला. नागपुरातील माहितीच अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार वनविभागाने ही आकडेवारी सादर केली आहे.
2021 मध्ये वाघांचे सर्वाधिक मृत्यू माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी राज्यात वाघांची संख्या किती, त्यांचे आतापर्यंत झालेले मृत्यू याबाबतची माहिती वनविभागाकडे मागितली होती. ही माहिती वनविभागाने दिली असता 2018 मध्ये वाघाची 4 शिकार, 12 वाघांचा नैसर्गिक मृत्यू, अपघाती 3 असे एकूण 19 वाघ मृत्युमुखी पडले. तर 2019 मध्ये 5 वाघांची शिकार, 9 नैसर्गिक रीत्या, अपघाती 3 असे ऐकून 17 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2020 मध्ये 5 वाघांची शिकार, विद्युत प्रवाहामुळे 3 नैसर्गिक रीत्या 9 आणि अपघाती 1 अशा 18 वाघांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये तब्बल 32 वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 19 वाघ नैसर्गिक, शिकारी मध्ये 7, अपघातामध्ये 1 तर विद्युत प्रवाहामुळे 3 अशी आकडेवारी आहे. 2022 मध्ये नैसर्गिक मृत्यू हे 18, शिकारी मध्ये 3 अपघातात 4 तर विद्युत प्रवाहामुळे 4 असे एकूण 29 वाघ मृत्यमुखी पडले आहेत. शिकाऱ्यांवर नियंत्रण आणण्यात अपयश विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारने नुकतीच देशभरातील वाघांची संख्या जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रात किती वाघ असल्याची माहिती विचारली असता प्रगणना झाल्यानंतर वाघांची संख्या अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती या माहिती अधिकारात दिली गेली. गेल्या पाच वर्षांत मृत्यू झालेल्या 115 वाघांपैकी सर्वाधिक 67 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा विभागाने केला आहे. मात्र यात 24 वाघांची शिकार झाल्याची माहिती विभागाने दिली आहे, जी धक्कादायक आहे, कारण शिकाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला हवे तसे यश मिळाले नाही, हेच दिसून येत आहे. बबली वाघीण आणि तिच्या बछड्यांची धमाल मस्ती, ताडोबातील वाघांचा पाहा Video जंगलातून जाणारे महामार्ग धोकादायक शिवाय जंगलातून जाणारे महामार्गही वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत असून 12 वाघ अपघातांचे बळी ठरले आहेत. शेतात लावण्यात येणारे विद्युत प्रवाह हे सुद्धा प्राण्यांच्या जीवावर उठले असून, 10 वाघ विद्युत प्रवाहाचे बळी ठरले आहेत. या वर्षात देशातही सर्वाधिक 127 वाघांच्या मृत्यूची नोंद असून कोरोना महामारीनंतर शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वन विभाग आणि प्रशासनाने यावर वेळीच लक्ष द्यावे, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केले आहे.