नागपूर, 26 जुलै : जंगल पर्यटनासाठी गेलेल्या प्रत्येकालाच वाघ पाहण्याची इच्छा असते. नागपूर जवळच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा हमखास व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. वाघ पाहण्याच्या ओढीनं इथं दरवर्षी लाखो पर्यटक ताडोबाला येतात. ताडोबातील वाघांच्या मस्तीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ताडोबा अभयारण्यातील बबली वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा हा व्हिडीओ आहे. अलिझंझा बफर गेट जवळ पर्यटकांना बबली वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचं मस्त दर्शन झालं. आईसोबत हे तीनही बछडे दंगामस्ती करत आहे. वन्यजीवप्रेमी इंद्रजीत मडावी यांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. या वाघांच्या दर्शनानं पर्यटक सुखावलेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्र हे 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना कोयर क्षेत्रात जंगल सफारीचा आनंद घेता येत नाही. पण सध्या पावसाळी वातावरणामुळे बफर झोनची सफारी देखील अविस्मरणीय अनुभव देतीय. या प्रसन्न वातावरणाचा पर्यटक आनंद घेत आहेत. बापरे! घरात एकापाठोपाठ सापडले 10 अजगराचे पिल्लं, आईचा शोध घेतला असता सगळे घाबरले, Video पेंच व्याघ्र प्रकल्प, कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य येथील जंगल सफारी 9 जुलै 2023 पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सिल्लारी आणि सुरेवानी पर्यटन गेट येथून मर्यादित स्वरूपात जंगल सफारीची सुविधा ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध असेल, असे वनविभागाने सांगितले आहे. ताडोबात किती वाघ? देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या कामगिरीचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला. यामधील आकडेवारीनुसार देशात वाघांची संख्या 3 हजार 167 वर पोहचली आहे. तर 2022 च्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रातली किमान वाघांची संख्या 390 आहे. व्याघ्रगणनेच्या अनुमनानुसार ही संख्या 466 च्या पुढे आहे. त्यात एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91 वाघ असल्याचा अंदाज आहे.