मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Insta Reels Nagpur Crime : Insta reelsसाठी काहीही, बड्या बापाच्या पोरांची कारमधून शहरात हुल्लडबाजी

Insta Reels Nagpur Crime : Insta reelsसाठी काहीही, बड्या बापाच्या पोरांची कारमधून शहरात हुल्लडबाजी

नागपूरमधील उच्चभ्रू घरातील मस्तवाल विद्यार्थ्यांची पहाटे कारमधून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकारसमोर आला आहे.

नागपूरमधील उच्चभ्रू घरातील मस्तवाल विद्यार्थ्यांची पहाटे कारमधून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकारसमोर आला आहे.

नागपूरमधील उच्चभ्रू घरातील मस्तवाल विद्यार्थ्यांची पहाटे कारमधून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकारसमोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नागपूर, 18 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून नागपूर शहरात दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान शहरात मागच्या दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील उच्चभ्रू घरातील मस्तवाल विद्यार्थ्यांची पहाटे कारमधून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकारसमोर आला आहे. मागच्या दोन दिवसांपू्र्वी म्हणजे 14 जानेवारी रोजी पहाटे 4 हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान याबाबत पोलीसांनी कारवाई करण्यास सुरूवात केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या कारमधून धरमपेठेत एका ठिकाणी जमा होऊन त्यांनी शहरातील रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाहनाच्या छतावर बसून त्यांनी आवाज करण्यास सुरुवात केली एक ते दीड तास विद्यार्थ्यांचा हा गोंधळ सुरू होता. यादरम्यान एकाने रील बनवून इंस्टाग्रामवर अपलोड केली. 

हे ही वाचा : 'पत्नी सतत महागडे गिफ्ट मागते आणि दिले नाही की मला...'; तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला पती

या रीलच्या आधारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाच्या छडा लावून आरोपी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अंबाझरी पोलिसांनी या रीलच्या माध्यमातून आरोपी विद्यार्थ्यांना शोधून त्यांची वाहन जप्त केली आहेत. दहा विद्यार्थ्यांवर या प्रकरणात कारवाई केली आहे. 

View this post on Instagram

A post shared by . (@mkmanishhh)

मात्र विद्यार्थ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अपघात झाला आणि यात कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण हा प्रश्न देखील या निमित्ताने उभा राहतो. सोबतच पालक देखील अल्पवयीन मुलांना महागड्या कार चालवायला देतात हे देखील आश्चर्यकारक आहे.

पुण्यातही असाच प्रकार

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान अशा घटना वारंवार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंम्तियाज अफजल हुसेन शेख (वय 37, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अतिक इक्बाल शेख (वय 37, रा. सय्यदनगर, हडपसर), सादीक शेख (वय 25), हुसेन मुस्तफा कादरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

First published:

Tags: Instagram, Instagram post, Nagpur, Nagpur News