जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: तुमची कार काळा धूर सोडतेय का? वेळीच घ्या काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान, VIDEO

Nagpur News: तुमची कार काळा धूर सोडतेय का? वेळीच घ्या काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान, VIDEO

Nagpur News: तुमची कार काळा धूर सोडतेय का? वेळीच घ्या काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान, VIDEO

Nagpur News: तुमची कार काळा धूर सोडतेय का? वेळीच घ्या काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान, VIDEO

कोणतीही गाडी फिट तेव्हाच असते जेव्हा इंजिन व्यवस्थित काम करत असतं. आपणही चारचाकी गाडी वापरत असाल तर ही माहिती आपल्यासाठीच आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 6 मे: कुठल्याही कारमधील इंजिन हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. कारच्या बाह्यंगांप्रमाणेच कारच्या अंतर्गत बाबींकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा थेट परिणाम कारच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे कारच्या इंजिनची योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. जर तुम्हालाही तुमच्या कारचे इंजिन परफेक्ट ठेवायचे असेल तर तुमच्या कारचे इंजिन नेहमी चांगले ठेवणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स नागपूरचे ऑटोमोबाईल इंजिनिअर निखिल उंबरकर यांनी सांगितल्या आहेत. गाडीची काळजी घेणं गरजेचं आपल्या कडे देखील एक चार चाकी कार असावी असे अनेकांचे स्वप्न असतं. हल्लीच्या कारमध्ये अनेक स्थित्यंतरे झाल्याचे अपल्याला दिसत आहेत. त्यात काही कार उत्पादक कंपन्या गाडीच्या दिसण्या सोबतच, इंजिन, अवरेज, कार सेफ्टी, इत्यादीकडे विशेष लक्ष देत आहेत. मात्र कारच्या रंग, सजावट, अशा बाह्य अंगाप्रमानेच गाडीतील इंजिन आणि इतर पार्टची काळजी घेणे गरजेचे आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नियमित सर्व्हिसिंग गरजेची गाडी 50 हजार ते 1 लाखावर चालली की गाडीच्या पार्टसची झिज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे गाडीमध्ये कंपनं निर्माण होतात. तसेच गाडीची कार्यक्षमता काही अंशी कमी होते. त्यामुळे कार वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. ठराविक कालावधी नंतर गाडी मधील पिस्टन आणि ब्लॉक मध्ये गॅप तयार झाले की त्यावर ऑईल येते आणि इंधन सोबत ते जळून सायलेन्सर मधून काळा धूर येतो. याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. गाडीमध्ये अनेक प्रकारची सेंसर असतात. त्यातील काही सुरक्षेसाठीही असतात. जसे की एपीएस, एअर बॅग, पावर स्टेरिंग, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल लेवल, कुलंट लेवल, इंजेक्टर, स्पार्क प्लग, यात बिघाड झाल्यास डॅशबोर्डवर वेगवेगळ्या लोगो प्रमाणे दिसतात. त्याकडे लक्ष देऊन काही बिघाड झाल्यास वेळीच दुरुस्ती केली पाहिजे. Nagpur News : वायू प्रदूषण मोजणं होणार सोपं आणि अचूक, पाहा काय आहे नवं संशोधन, Video सेफ्टी फिचरवर द्या लक्ष गाडी दुरुस्त करतेवेळी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये डायग्नोसिस स्कॅनर द्वारे कारची संपूर्ण तपासणी होत असते. या स्कॅनरद्वारे कारच्या इंजिन मधील बिघाड सहज लक्षात येऊ शकतो. हल्ली प्रत्येक कार मध्ये एअर बॅग अनिवार्य करण्यात आले आहे. यासह ईपीएस हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंट्रोल होणारे अत्याधुनिक सिस्टम बसविण्यात आले आहे. यामध्ये पावर स्टेरिंग अन कंट्रोल होत असेल तर ईपीएस गाडी स्लिप होऊ देत नाही. असे भरपूर सेफ्टी फीचर कार मध्ये आहेत. त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे, अशी माहिती ऑटोमोबाईल इंजिनिअर निखिल उंबरकर यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात