विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 18 एप्रिल: प्रदूषण ही जगभरातील एक मोठी समस्या असून जागतिक स्तरावर या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधन व उपाययोजना राबिण्यात येत असतात. पर्यावरण क्षेत्रात सखोल अभ्यास करणारी नागपूर स्थित देशभर प्रसिद्ध असलेली नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात CSIR NEERI च्या वैज्ञानिकांनी भगीरथ प्रयत्न केले असून एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. प्रदूषणाचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी ड्रोनची निर्मित केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही ठिकाणचे हवेतील प्रदुषण तपासणे शक्य होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून वायू प्रदुषणाची पातळी मोजता येणार या ड्रोनच्या माध्यमातून वायू प्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार आहे. नीरीने या उपकरणाचे नाव नीरी-क्षण- एक्यू असे ठेवले आहे. या असिस्टेड व्हर्टिकल प्रोफाइलिंगचे एक अद्वितीय ऐप्लिकेशन व ड्रोनच्या साह्याने हवेतील प्रदूषण, हवेची गुणवत्ता तपासता येणार आहे. उंच स्थानांवर, दुर्गम क्षेत्रमध्ये आणि वास्तविक वेळी प्रदूषकाचे प्रमाण विश्वासार्हपाणे GPS उपकरणांच्या सहाय्याने घेता येणार आहे. या ड्रोनचा वापर करून स्वयंचलित नमुना घेणे शक्य आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील दुर्गम ठिकाणी देखील वेगवेगळ्या उंचीवर हवेच्या गुणवत्तेच्या मापदंडांचा अभ्यास करण्यासाठी हे ड्रोन उड्डाण करू शकते. शिवाय यामुळे सॅम्पलिंगची किंमत आणि मनुष्यबळाची देखील बचत होणार आहे.
शहरी, ग्रामीण क्षेत्रात उपयुक्त बहुतांश वेळी काही भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे जमिनीपासून वेगवेगळ्या उंचावर तसेच दोन इमारतींच्या मध्ये येणाऱ्या भागात वायू प्रदूषणाची पातळी किती आहे हे मोजणे अवघड असते. ही उणीव लक्ष्यात घेता पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नीरीने यावर ड्रोनच्या रूपाने एक उपाय योजला आहे. CSIR NEERI ने नीरी- क्षण एक्यू या नावाने ड्रोन व असिस्टेड हर्टिकल प्रोफाइलिंगचे एक अद्वितीय एप्लिकेशन विकसित केले आहे. कॅलिब्रेटेड लाइट वेट सेन्सर मॉड्यूल्स आणि व्यावसायिक ड्रोनसह गरज आणि पेलोड क्षमतेनुसार वेगवेगळे सेन्सर या ड्रोनला जोडले जाऊ शकतात. हे उपकरण वेगवेगळ्या शहरी आणि ग्रामीण ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर PM, S02, NOx आणि CO सारख्या हवेच्या गुणवत्तेच्या मापदंडांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. झेड अॅक्सिस वरील नवे तंत्रज्ञान या नव्या यंत्रणेतील ‘मल्टी-रोटर’ यूएव्ही तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय सेन्सर यामुळे आकाशातील अडथळ्यांसह शहरी वातावरणातील गर्दीतसुद्धा ‘झेड एक्सिस’ वरील ‘डाटा’ मिळू शकतो. डेटा कॅप्चरिंग हे अनुमानांसाठी खूप महत्वाचे आहे. या उपकरणाद्वारे उंच स्थानांवर, दुर्गम क्षेत्रांमध्ये आणि वास्तविक वेळी प्रदूषकाचे प्रमाण विश्वासार्हपणे GPS उपकरणांच्या सहाय्याने घेता येणार आहे. शिवाय या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जाऊ शकतात. ‘नीरी’च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या यंत्रणेमुळे शहराच्या विविध भागातील उंच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना वायू प्रदूषणाच्या धोक्याची माहिती मिळू शकेल, अशी माहिती नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक पियुष कोकाटे यांनी दिली. दिव्यांग धीरजचा वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त 13 दिवसांत श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल प्रवास, Video ‘नीरी-क्षण- एक्यू’चे ठळक वैशिष्ट्य सहज रीतीने नेता येण्याजोगे कोणतेही लाइट वेट सेंसर मॉडेल्स संलग्न केले जाऊ शकते. शिवाय व्हरटिकल डेटा संग्रह करणे शक्य आहे. प्रवेश योग्य नसलेल्या झोनमध्ये देखील जाऊन सॅम्पलिंगची किंमत 50% पर्यंत कमी केली जाऊ शकते. या पद्धतीचा वापर करून स्वयंचलित नमुना घेणे सहज शक्य आहे. ‘नीरी-क्षण- एक्यू’चा उपयोग औद्योगिक क्लस्टर्स, ट्रफिक इंटरसेक्शन, शहरी हॉटस्पॉट्स, म्युनिसिपल डंपसाइट मधील प्रदूषण पातळीचे प्रभाव मूल्यांकन करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होऊ शकतो. तसेच प्रदूषक आणि त्याचा फैलाव समजून घेण्यासाठी शहरी उंच इमारतीच्या आसपास वेगवेगळ्या उंचीवर प्रदूषकांचे निरीक्षण करणे शक्य आहे. यात मनुषाबळाची बचत होणार असून मानवी हस्तक्षेपा शिवाय धोकादायक स्त्रोतांकडून नमुना घेणे शक्य आहे. तसेच औद्योगिक साइटच्या आसपास कुंपनाचे निरीक्षण करणे देखील शक्य आहे, अशी माहिती वरिष्ठ वैज्ञानिक पियुष कोकाटे यांनी दिली.