नागपूर, 8 जुलै : नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपली मुलगी आणि पत्नीसोबत (Husband molested wife) धक्कादायक प्रकार केला. मुलगी (Daughter) ही लक्ष्मी मानली जाते. मात्र, एकाने आपल्या पत्नीचा छळ केला आणि एक धक्कादायक कृत्य केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पीडित महिलेचे 2016मध्ये रोशन कुंजरकर नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांचा संसार एक वर्ष चांगला चालला. मात्र, या दाम्पत्याला 2017ला एक मुलगी झाली आणि यानंतर पतीची वागणूक अचानकच बदलली. त्याला दारुचे व्यसन लागले आणि तो दारु पिऊन आपल्या पत्नीला, मारहाण करायचा. मला ही मुलगी नको आहे तसेच तू तिला घेऊन माझ्या घरातून निघून जा, असा तगादा त्याने आपल्या पत्नीकडे लावला होता. इतकेच नव्हे तर मुलगी झाली म्हणून मला हुंडा हवा आहे. तु माहेरुन पैसे आणि नाहीतर धंदा करुन पैसे कमव आणि तुझ्या मुलीला पोस, या शब्दात त्याने पत्नीचा छळ करायला सुरुवात केली. या सर्व प्रकारला ही महिला कंटाळली होती. त्यामुळे ती अनेकदा माहेरी निघून गेली. मात्र, ती माहेरी निघून गेल्यावर तिचा पती रोशन हा तिची माफी मागायचा आणि तिला आपल्या घरी परत आणायचा. मात्र, काही दिवसांनी पुन्हा तो आधीसारखंच वागायला लागायचा. आरोपी पतीने 21 जुलै 2020 रोजी पीडित महिलेला जोरदार मारहाण केली होती. यानंतर या महिलेले त्याच्याविरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. गेल्या 7 फेब्रुवारीला या महिलेच्या दिराचे लग्न होते. त्याच्या एक दिवस अगोदर आरोपी रोशन पत्नीच्या कामाच्या ठिकाणी गेला व आता माहेरी परत जायचे नाही, असे म्हणत त्याने तिला चाकू काढत धमकावले. हेही वाचा - बडतर्फ पोलिसाचं दुष्कृत्य! नोकरीच्या बहाण्याने बोलावलं आणि तरुणीला रात्रभर ओलीस ठेवून केलं असं की… 1 जून रोजी आरोपी रोशन याने दुसऱ्याच मुलीशी परस्पर लग्न केल्याचे पीडित महिलेला समजले. त्या दोघांच्या लग्नाचे फोटोही तिला मिळाले. यानंतर तिने थेट अजनी पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरोधात तक्रार दिली. यानतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हुंडाबंदी अधिनियमासह एकूण पाच कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.