नागपूर, 6 जुलै : महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्काराच्या (Rape) घटना समोर येत आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. आता नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात एका तरुणीवर नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका बडतर्फ पोलीस शिपायाने अत्याचार (Physical abused by suspended police officer) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश योगेश्वर हेडाऊ (24, एमएसईबी कॉलनी, भंडारा) याला अटक केली आहे. संपूर्ण प्रकरण काय - अंबाझरी परिसरात राहणारी एक तरुणी 29 जूनला नोकरीच्या शोधत आपल्या बहिणीसह सीताबर्डी (Sitabardi) येथे आली होती. पीडित तरुणीचे वय 24 इतके आहे. या दोन्ही बहिणी मोर भवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. याचवेळी त्याठिकाणी नीलेश हेडाऊ नावाचा व्यक्ती उभा होता. त्याने नोकरी संदर्भातील या दोन्ही बहिणींचा संवाद ऐकल्यानंतर आपल्याकडे नोकरी असल्याची बतावणी केली. तसेच आपण हॉटेल मालक आहोत, अशी ओळखही करुन दिली. यानंतर त्या तरुणीचा मोबाईल नंबरही घेतला. तसेच 3 जुलैला नीलेशने तरुणीला फोन केला आणि करून पारडीत हॉटेल सुरू आहे, त्याच्या मालकाला मुलाखत घ्यायची आहे, असे सांगून एसटी स्टँडवर बोलावले. याठिकाणी पोहोचल्यावर तरुणी आणि नीलेश भंडारा बसमध्ये बसले आणि रात्री आठ वाजेच्या सुमारास पारडी येथे उतरले. याठिकाणी पोहोचल्यावर नीलेश या तरुणीला मुलाखत देण्याच्या बहाण्याने एका निर्जन घरात घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर जबरदस्ती केल्यावर तरुणी याठिकाणाहून आपली सुटका करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळ काढल्यानंतरही पुन्हा ती नीलेशच्या हाती लागली. आणि यानंतर नीलेशने तिला एका घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने तिला रात्रभर ओलीस ठेवले आणि नंतर एसटी स्टँडवर सोडून तिथून पोबारा केला. यानंतर पीडित तरुणी घरी आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. ती जखमी झाल्याने घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि नंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हेही वाचा - नागपुरात हाय प्रोफाईलवर पार्टीवर छापा, अमली पदार्थांच्या सेवनाची मिळाली होती माहिती आरोपी पत्नी राहते वेगळी - याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी हा नीलेश हेडाऊ असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी नीलेशवर यापूर्वीही विनयभंग, पोक्सो, मारहाण, धमकावणे, असे गुन्हे आहेत. त्याची पत्नीसुद्धा त्याच्यापासून वेगळी राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.