विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 23 मार्च: गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं 800 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे अनेकांनी सराफा बाजारात सोनं खरेदी केलं. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. नागपूर सराफा बाजारात आजचा दर सोन्याचा 59 हजार 500 रुपयांवर आहे. तर चांदीच्या दरातही तब्बल 900 रुपयांची वाढ झाली असून आज चांदीचा दर 70 हजार रुपये प्रती किलोवर गेला आहे.
सराफा बाजारात गर्दी
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खेरेदीसाठी नागपूरकरांनी सराफा बाजारात ग्राहकांनी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र होते. दोन दिवसांपूर्वी सोन्याने 60 हजारांचा टप्पा ओलांडला होता. परंतु, काल पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध
एक एप्रिल 2023 पासून हॉलमार्क असलेले दागिनेच वैध ठरणार आहेत. हॉलमार्क हे अधिकृत चिन्ह असून ते धातूपासून बनवलेल्या वस्तूंवर मारले जाते. यापुढे हॉलमार्क असेल तरच दागिने वैध ठरणार असल्याने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे. व्यापाऱ्यांनी शासनाने हॉलमार्क संबंधी दिलेल्या सूचनांचे पालक केले नाही तर कारवाई करण्यात येणार आहे. सराफा व्यापाऱ्यांना एक एप्रिल 2023 पासून सहा अंकांचे एचयुआयडी असलेले सोन्याचे दागिने विकता येणार आहेत.
बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा, राज्यातील 15 जिल्ह्यांत पावसाची शक्यता
नागपूर शहरातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,500
10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,500
10 ग्रॅम 20 कॅरेट- 53,900
10 ग्रॅम 18 कॅरेट- 47,600
नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,950
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,650
10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,390
1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,760
चांदीचे दर
प्रतिकिलो - 70,000
नागपूर शहरातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,100
10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,100
10 ग्रॅम 20 कॅरेट- 53,300
10 ग्रॅम 18 कॅरेट- 47,200
नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,900
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,610
10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,330
1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,720
चांदीचे दर
प्रतिकिलो - 69,100
टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur, Nagpur News