मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gold-Silver Rate Today in Nagpur : सोनं 60 हजार पार, पाहा नागपुरातील आजचा दर

Gold-Silver Rate Today in Nagpur : सोनं 60 हजार पार, पाहा नागपुरातील आजचा दर

Gold-Silver Rate Today in Nagpur : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज नागपुरात सोन्याने साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold-Silver Rate Today in Nagpur : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज नागपुरात सोन्याने साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold-Silver Rate Today in Nagpur : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज नागपुरात सोन्याने साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nagpur, India

विशाल देवकर, प्रतिनिधी

नागपूर, 13 मार्च : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करू इच्छिणारांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मराठी नववर्षारंभ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नागपूर सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा सोन्याचा दर 60 हजार 100 रुपयांवर गेला आहे. तर चांदीच्या दरातही 1200 रुपयांची वाढ झाली असून चांदी 69 हजार 100 रुपये प्रति किलो आहे.

चार दिवसांत 3 हजारांहून अधिक दरवाढ

महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष असते. होळीनंतर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याचे दर 3 हजारांहून अधिक वाढले आहेत.

चार महिन्यांत 8 हजारांनी वाढलं सोनं

राज्यातील सराफा मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे दर रोज बदलत असतात. 10 नोव्हेंबरला सोन्याचा दर 52 हजार रुपये होता. त्यानंतर चार महिन्यात सोने 8 हजार रुपयांनी महाग झाले आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल 1,500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांची निराशा झाल्याचे चित्र आहे.

Gold-Silver Rate today in Pune : सोन्याच्या दराची पुन्हा उसळी, पाहा आजचा पुण्यातील भाव

नागपूर सराफा बाजारात व्हरायटी

आता नागपूरच्या बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.तसेच सध्या होलमार्क असलेल्या दागिन्यांना अधिक मागणी आहे, अशी माहिती पंकज चंबोळे यांनी दिली.

नागपूर शहरातील आजचा सोन्याचा दर

नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम)

10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,100

10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,100

10 ग्रॅम 20 कॅरेट- 49,950

10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,100

नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,010

1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,710

10 ग्रॅम 20 कॅरेट- 4,995

1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,810

चांदीचे दर

प्रतिकिलो - 69,100

नागपूर शहरातील कालचा सोन्याचा दर

नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम)

10 ग्रॅम 24 कॅरेट - 58,600

10 ग्रॅम 22 कॅरेट- 55,700

10 ग्रॅम 20 कॅरेट- 51,900

10 ग्रॅम 18 कॅरेट- 46,900

नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,860

1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,570

10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,190

1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,690

चांदीचे दर

प्रतिकिलो - 67,800

टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.

First published:

Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur, Nagpur News