विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 31 मार्च : भारतीय लोक सोने चांदीसारख्या मौल्यवान गोष्टींचे चाहते आहेत. त्यामुळे सण, उत्सव, समारंभ अशा मंगल प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात. नागपुरातील सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढउतार होत असतात. आज सोन्याच्या दरात पुन्हा 400 रुपयांनी वाढ झाली आहे. नागपुरात 24 कॅरेट सोन्याचा दर 60 हजार रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 400 रुपयांनी वाढ होऊन 57 हजार रुपये इतका झाला आहे. चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ गेल्या काही काळत सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून चांदी 70 हजारांच्या घरात टिकून होती. गुरुवारी चांदी प्रति किलो 200 रुपयांनी महाग झाली. तर आज पुन्हा चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदी तब्बल 1400 रुपयांनी महागली आहे. चांदीचा आजचा दर 72 हजार 300 रुपये प्रति किलोवर गेला आहे.
नागपूर शहरातील आजचा सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,000 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,000 10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,200 10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,000 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,000 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,700 10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,420 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,800 चांदीचे दर प्रतिकिलो - 72,300 नागपूर शहरातील कालचे सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,600 10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,600 10 ग्रॅम 20 कॅरेट- 53,900 10 ग्रॅम 18 कॅरेट- 47,700 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,960 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,660 10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,390 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,770 चांदीचे दर प्रतिकिलो - 70,900 हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क असणे अनिवार्य करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2023 पासून हॉलमार्क असलेले दागिनेच वैध ठरणार आहेत. हॉलमार्क हे अधिकृत चिन्ह असून ते धातूपासून बनवलेल्या वस्तूंवर मारले जाते. व्यापाऱ्यांनी शासनाने हॉलमार्क संबंधी दिलेल्या सूचनांचे पालक केले नाही तर कारवाई करण्यात येणार आहे. वीकेंडला होणार पुणेकरांचा खिसा रिकामा! आजचा सोन्याचा दर पाहिला का? नागपूर सराफा बाजारात व्हरायटी उपराजधानी नागपूरचा सराफा बाजार मोठा आहे. या ठिकाणी लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)