जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनोळख्या लिंकवर केलं क्लिक; कर्जाच्या नावाखाली विद्यार्थिनीला धमक्या, न्यूड मॉर्फ फोटोही व्हायरल

अनोळख्या लिंकवर केलं क्लिक; कर्जाच्या नावाखाली विद्यार्थिनीला धमक्या, न्यूड मॉर्फ फोटोही व्हायरल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

संबंधित तरुणीला तिच्या तिच्या व्हॉट्सअपवर मागच्या आठवड्यात 639099220156 या क्रमांकावरुन व्हॉट्सअपवर मेसेज आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 4 जुलै : सध्या ऑनलाईनचा जमाना (Online) आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Digital Era) आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घडनाही पाहायला मिळत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीला अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मॅसेजवरील लिंक ‘क्लिक’ करणे एका विद्यार्थिनीला (Girl Clicked on unknown link) प्रचंड महागात पडले आहे. काय आहे प्रकरण - एका विद्यार्थिनीला एक धक्कादायक अनुभव आला आहे. तिच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मॅसेजवरील लिंक ‘क्लिक’ करणे एका विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले आहे. तिने कर्ज घेतले नाही. मात्र, लिंकवर क्लिक केल्यानंतर न घेतलेल्या कर्जासाठी तिला धमक्या येत आहेत. इतकेच नव्हे तर तिच्या फोनवरील सर्व ‘डेटा’देखील ‘हॅक’ झाला आहे. तसेच तिच्या मोबाईल कॉन्टॅक्ट्समधील तिच्या नातेवाईकांना ‘मॉर्फिंग’ केलेले न्यूड फोटो पाठविण्यात येत आहेत. या प्रकाराने विद्यार्थिनी या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक तणावात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या क्रमांकावरुन आला होता मेसेज -  संबंधित तरुणीला तिच्या तिच्या व्हॉट्सअपवर मागच्या आठवड्यात 639099220156 या क्रमांकावरुन व्हॉट्सअपवर मेसेज आला. या मेसेजमध्ये एका संकेतस्थळाची ‘लिंक’ होती. तसेच लिहिले होते की, तुम्ही आमच्याकडून घेतलेले कर्ज त्वरित भरा अन्यथा तुमचे फोटो व्हायरल होतील. हा मेसेज पाहिल्यावर या विद्यार्थिनीने या लिंकवर क्लिक केले व त्यानंतर तिच्या मोबाईलवर ‘ॲप’ डाऊनलोड झाले. इतकेच नव्हे तर तिने अॅप डाऊनलोड केल्यावर सर्व परवानग्यादेखील अजाणतेपणाने दिल्या. मात्र, यानंतर तिला वेगळाच अनुभव आला. तिला वेगवेगळ्या क्रमांकावरुन व्हॉट्सअपवर मॅसेजेस आणि फोन येण्यास सुरुवात झाली. तसेच कर्जाची रक्कम त्वरित भरा अन्यथा तुमचे वाईट फोटो व्हायरल करू, अशा धमक्या यायला लागल्या. या सर्व प्रकारामुळे ही विद्यार्थिनी घाबरुन गेली होती. त्यामुळे तिने त्यांना 12910 रुपये पाठवले आणि ते अॅप डिलीट केले. मात्र, यानंतरही तिच्या नातेवाईकांना तिने कर्ज घेतले असून तिचे फोटो व्हायरल करू अशा धमक्या यायला लागल्या. आरोपींनी एक मॉर्फ केलेला न्यूड फोटोदेखील पाठवला होता. याप्रकारचे मेसेजेस तिच्या नातेवाईंकांना गेल्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हेही वाचा -  नागपूर : प्रेयसीला लॉजमध्ये नेलं; संभोग करताना अचानक बेशुद्ध पडला तरुण; काही तासात मृत्यू अखेर या संपूर्ण प्रकाराला कंटाळून या तरुणीने अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे तरुणी मानसिक धक्क्यात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात