मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भंडारा : दिवाळीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; समजावायला गेल्याने दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

भंडारा : दिवाळीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; समजावायला गेल्याने दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा "हंगाम कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता

भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा "हंगाम कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता

भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा "हंगाम कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 2 नोव्हेंबर : दिवाळी हंगाम कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी घालणाऱ्या युवकांना समजावयाला गेलेल्या भंडारा पंचायत समितीच्या उपसभापतीसह चार आयोजकांना लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ही धक्कादायक घटना भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

दरम्यान, जखमींवर भंडारा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पांच तरुणावर कारधा पोलिसात गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे. आशिष पडोळे (25), कमलाकर अहिर (42), निखिल पाणबुडे (28), अक्षय साखरवाडे (25) यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन बालक, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं -

भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त ग्रामीण लोककलेचा "हंगाम कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्यरात्री तिथे कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोब्रागडे व इतर चार लोक गेले असता यावरुन दोन गटात सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला.

त्यानंतर दोन्ही गटात राडा होऊन त्या तरुणांनी मोठ्या लाठ्याकाठ्यानी मारहाण सुरू केली. यात प्रशांत खोब्रागडे (52) यांच्यासह राजेंद्र साखरवाडे (34), प्रशांत माकडे (27), 12 वर्षीय आदेश देशमुख या चौघांना जबर मारहाण झाली. लागलीच जखमीना भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा - मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून चाकूने भोसकले, हत्येचा LIVE VIDEO

याप्रकरणी जखमी प्रशांत खोब्रागडे यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी आशिष पडोळे (25), कमलाकर अहिर (42), निखिल पाणबुडे (28), अक्षय साखरवाडे (25) यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकावर गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime news, Diwali