जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून चाकूने भोसकले, हत्येचा LIVE VIDEO

मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून चाकूने भोसकले, हत्येचा LIVE VIDEO

मुळात या आधी या खूनाचे कारण धक्का लागला म्हणून खून केला असं सांगण्यात आलं होतं. मात्र...

मुळात या आधी या खूनाचे कारण धक्का लागला म्हणून खून केला असं सांगण्यात आलं होतं. मात्र...

मुळात या आधी या खूनाचे कारण धक्का लागला म्हणून खून केला असं सांगण्यात आलं होतं. मात्र…

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 02 नोव्हेंबर : मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील कामोठे परिसरातील घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका बेकरीत काम करणाऱ्या 17 वर्षीय विशाल मौर्या रात्री काम आटोपून टपरीवर नेहमीप्रमाणे पान खाण्यासाठी गेला होता. तिथे आपल्याच ओळखीचे रवींद्र हरीयानी आणि राज वाल्मिकी उभे होते. त्यांनी आपल्याकडचा मोबाईल डाटा संपला म्हणून मयत विशाल मौर्य याच्याकडून हॉटस्पॉटद्वारे नेट कनेक्टसाठी मोबाईल पासवर्ड मागितला.

जाहिरात

मात्र तो देण्यास रवींद्रने नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याच रागातून कारणाने या दोघांनी आधी त्याला लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. पान वाल्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी राज याने आपल्या जवळ असलेल्या चाकू विशालच्या पाठीत खुपसले आणि पळून गेला. त्यात विशाल गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (बीड : आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य, व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी) दुसऱ्याच दिवशी गुप्त माहितीच्या आधारे कामोठे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. नक्की प्रकरण काय आहे, धक्का लागण्याचे कारण आहे की, अजून वेगळं कारण आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. (ब्रेकअप करण्यास दिला नकार, प्रेयसीनं प्रियकराला विष देऊन ठार मारलं आणि नंतर…) मात्र मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून थेट हत्या केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुळात या आधी या खूनाचे कारण धक्का लागला म्हणून खून केला असं सांगण्यात आलं होतं. मात्र आरोपी घटना घडली त्यावेळी दारूच्या नशेत होते. सकाळी त्यांची चौकशी केली होती तेव्हा त्यांनी मारण्याचे कारण मोबाईल पासवर्ड सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात