मुंबई, 12 डिसेंबर : गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीनं बाप्पाची भक्ती करत असतो. दरवर्षी गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होतं. त्यावेळी भक्तांचा उत्साह अवर्णनीय असतो. त्यानंतरची दहा दिवस हे मंगलमय भक्तीनं भारलेले असतात.
ठाण्याच्या
दिलीप जनार्दन वैती या गणेशभक्तानं बाप्पाच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलं आहे. गेल्या तीन दशकांमध्ये एक हजारांहून अधिक गणेशमूर्तींचा संग्रह आहे. काय आहे विशेष? ठाण्याच्या राबोडी परिसरात राहणाऱ्या वैती यांनी 9 मिलिमीटरपासून ते 5 फुटापर्यंतच्या मूर्ती भटकंती करुन जमा केल्या आहेत. त्यांच्या घरी घरी पूर्वजांचा नवसाचा गणपती पुजला जात असे. याच प्रेरणेतून वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील प्रदर्शनातून पॉकेटमनी खर्चून शिळेची पहिली गणेशमूर्ती घरात आणली. त्यानंतर घरात त्यांना बरीच बोलणी खावी लागल्याचे वैती यांनी सांगितले. मात्र, कालांतरानं संपूर्ण घरच गणेशमय झाल्याने वैती कुटुंबाची हीच ओळख बनली आहे. कलेचे भोक्ते असलेल्या दिलीप वैती यांनी जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टस्चे शिक्षण घेतले असून ते पूर्ण वेळ कलाक्षेत्राशी निगडित व्यवसायात आहेत.
खरा मावळा! 27 वर्षांपासून एक पैसा न घेता महाराजांची सेवा करणारे मेहबूब हुसेन
वैती यांच्या घरात 20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते 300 किलोपर्यंत आणि अर्धा इंचापासून पाच फुटी गणेशमूर्तीचा संग्रह त्यांनी केला आहे. त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये मूर्तींसाठी खास व्यवस्था केली आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण रचनेत तब्बल 1000 पेक्षा जास्त गणेशमूर्ती विराजमान आहेत. माती, शाडू, लाकूड, सोने-चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख-शिंपले, नारळ, फायबर, सिरॅमिक टेराकोटा, चायना, मार्बल, दगड, काच अशा विविध प्रकारांतील गणेशमूर्ती आहेत. आरामात पहुडलेले गणराय, क्रिकेट खेळणारे बाप्पा, सभागायन करताना, खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, व्यायाम करताना, मूषकराजांच्या शाळेत शिकवताना, आदिवासी वेशात, बालरूपातील लोभस गणेशाच्या मूर्ती मन मोहून घेतात. त्यांच्या या संग्रहालयात जपान, इंडोनेशियासह कंबोडिया आदी देशातील आणि भारतभरातील मूर्तींचा समावेश आहे. तसेच प्रदर्शनातून आणि दुकानातून आणलेल्या मूर्तींनी आज संपूर्ण घरच बाप्पामय बनले आहे.
गाणी, सिनेमा रेकॉर्ड प्लेयवर ऐकायला आवडणाऱ्यांसाठी ‘इथं’ आहे खजिना, पाहा Video
हा संग्रह जोपासताना प्रत्येक गणेशमूर्तीची देखभालही काळजीपूर्वक करावी लागते. पंधरवड्यातून एकदा बहीण अर्चनासह सर्व मूर्ती पाण्याने धुऊन-पुसून ठेवल्या जातात. सध्या माॅर्निंग मोरया हा उपक्रम गेल्या ४ ते ५ वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. तर दररोज एक चित्र ते रेखाटतात. या रेखाटण्यात आलेल्या गणेशावर कवींनी उत्स्फूर्तपणे कविता देखील रचल्या आहेत, अशी माहिती वैती यांनी दिली.
गुगल मॅपवरून साभार