मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर : फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

नागपूर : फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

मृत शेतकरी रमेश चरडे

मृत शेतकरी रमेश चरडे

किटकांमुळे पीक नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणी करतो.

  • Published by:  News18 Desk
नागपूर, 17 सप्टेंबर : शेतात पिकावर कीटकनाशकामुळे पिक खराब होऊ नये, नष्ट होऊ नये म्हणून शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात. हे कीटकनाशक फवारणी करताना काळजी घेऊन, इतर सुरक्षा उपकरणे वापरुन फवारणी केली जाते. सध्या शेतीकामाचे दिवस असल्याने फवारणीची कामे सुरू आहेत. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात शेतात पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील काचुरवाई गावात ही दुर्दैवी घटना घडली. रमेश चरडे हे काल आपल्या शेतामध्ये पिकांना फवारणी करत होते. शेतात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना त्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. तर शेतकरी रमेश चरडे यांनी मास्क व इतर सुरक्षा उपकरणे वापरले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात सांगितले. यवतमाळमध्ये 23 शेतकऱ्यांचा मृत्यू - शेतातील पिकाची वाढ व्यवस्थित व्हावी, शेतीपिकाचे किटकांमुळे नुकसान होऊ नये, पिक नष्ट होऊ नये म्हणून शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणी करतो. काही वेळा योग्य ती काळजी न घेतल्याने दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असते. 2017मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तब्बल 23 शेतकऱ्यांचा असाच फवारणी दरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हेही वाचा - अन् थेट टॉवरवर गड्यांची दारू पार्टी, प्रशासनाची तारांबळ; वाचा, नेमकं काय घडलं? नागपुरात तरुणीवर वेळोवेळी अत्याचार - दरम्यान, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अनेक महिने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नंदकिशोर ऊर्फ नंदू मोरेश्वर उईके (वय 35, बाजारगाव, सावंगा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला गणेशपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडित तरुणी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर नंदू तिच्या घरी भाड्याने राहत होता. त्याची तरुणीवर अल्पवयीन असतानापासूनच वाईट नजर होती. त्यामुळे त्याने तिला स्वतःच्या जाळ्यात फसवून जून 2021मध्ये तिला गणेशपेठेतील जुन्या वस्तीतील एका घरात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.  याप्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
First published:

Tags: Death, Nagpur News

पुढील बातम्या