मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अन् थेट टॉवरवर गड्यांची दारू पार्टी, प्रशासनाची तारांबळ; वाचा, नेमकं काय घडलं?

अन् थेट टॉवरवर गड्यांची दारू पार्टी, प्रशासनाची तारांबळ; वाचा, नेमकं काय घडलं?

यवतमाळच्या भोसा येथे आज सकाळीच दोन दारुडे दारू पिण्यासाठी चक्क टॉवरवर चढले.

यवतमाळच्या भोसा येथे आज सकाळीच दोन दारुडे दारू पिण्यासाठी चक्क टॉवरवर चढले.

यवतमाळच्या भोसा येथे आज सकाळीच दोन दारुडे दारू पिण्यासाठी चक्क टॉवरवर चढले.

  • Published by:  News18 Desk
यवतमाळ, 18 सप्टेंबर : अनेकांना दारुचे व्यसन असते. मग काही जण विकेंडला दारु पार्टीही करतात. किंवा इतर वेळीसुद्धा मित्रांसोबत, नातेवाईकासोबत दारू पार्टीचा प्लान करतात. यासाठी ते एखादे हॉटेल, शेतात किंवा काहीजण घरीसुद्धा पार्टी करतात. मात्र, यवतमाळात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. याठिकाणी दोन दारूडे चक्क टॉवरवर चढल्याची घटना घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - यवतमाळच्या भोसा येथे आज सकाळीच दोन दारुडे दारू पिण्यासाठी चक्क टॉवरवर चढले. या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. त्यांनी केलेल्या विरुगीरीने साऱ्यांनाच वेठीस धरले. अनिकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी या दोन दारुड्यांची नावे आहेत. दोघांनी दारूची नशा करण्यासाठी चक्क टॉवरवर बैठक मांडली. यावेळी टॉवरवरून आरडाओरड सुरू झाल्याने गर्दी जमा झाली. त्यांचे कुटुंबीही आरडाओरड करून रडायला लागले, त्यानंतर पोलिसांना व अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले आणि त्यांनी दारुड्यांना सुखरूप उतरविले. या संपूर्ण प्रकाराने महिलांनी पोलिसांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. हेही वाचा - अमरावती : जावयाने केली मोठी फसवणूक, रिटायरमेंटचे 7 लाख अन् लाखोंचे दागिने लुटले भोसा येथे अवैध दारू, गांजा विक्रीचे अनेक अड्डे झाल्यामुळे कर्त्या पुरुषांना, तरुण, शाळकरी मुलांना दारू, गांजाचे व्यसन जडले. परिणामी गुन्हेगारी वाढली आहे. तसेच महिला, मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले. असे असूनही पोलीस मात्र मागणी करूनही कारवाई करीत नसल्याने यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला.
First published:

Tags: Alcohol, Party, Yavatmal

पुढील बातम्या