मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /फोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव उघड करा; खडसेंचा रोख नेमका कोणाकडं?

फोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव उघड करा; खडसेंचा रोख नेमका कोणाकडं?

एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 28 डिसेंबर : फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु न्यायालयाकडून हा रिपोर्ट अमान्य करण्यात आला आहे. या अहवालामध्ये त्रुटी असून,  या प्रकरणात आणखी तपास करून त्रुटींची पूर्तता करा व पुन्हा नव्याने अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील मोठी मागणी केली आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हटलं एकनाथ खडसे यांनी?  

फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असे मी वाचले.  68 दिवस माझाही फोन टॅप करण्यात आला होता. त्यांना आदेश देणाऱ्यांचा हेतू शुद्ध असेलच असे नाही. माझा जबाव न घेता क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला.  या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा फोन टॅप केला त्यांना समोर बोलावून जवाब घेतले पाहिजे. तसेच रश्मी शुक्ला यांच्या मागे कोण आहे याची माहिती मिळाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत?

काय आहे न्यायालयाचा नवा आदेश? 

पुणे पोलिसांकडून फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने हा रिपोर्ट अमान्य केला आहे. या रिपोर्टमध्ये न्यायालयाकडून काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी तपास करून त्रुटींची पूर्तता करा व पुन्हा नव्याने अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse