जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत?

फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत?

फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत?

फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडून पोलिसांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 डिसेंबर : फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंगचा मुद्दा ‘मविआ’मधील नेत्यांकडून उचलून धरण्यात आला होता. या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला . मात्र मविआचे सरकार जाऊन शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर  पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. परंतु न्यायालयाकडून हा रिपोर्ट अमान्य करण्यात आला आहे. हा रश्मी शुक्ला यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्याता आहे. काय आहेत न्ययालयाचे आदेश  पुणे पोलिसांकडून फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने हा रिपोर्ट अमान्य केला आहे. या रिपोर्टमध्ये न्यायालयाकडून काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी तपास करून त्रुटींची पूर्तता करा व पुन्हा नव्याने अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात