मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक...शाळेतील वर्गखोलीतच दारू पिऊन मुख्याध्यापकाचा प्रताप, मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ

धक्कादायक...शाळेतील वर्गखोलीतच दारू पिऊन मुख्याध्यापकाचा प्रताप, मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ

मद्यपी शिक्षक

मद्यपी शिक्षक

मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 23 नोव्हेंबर : शिक्षकाचे स्थान हे समाजात आदर्श असते. शिक्षकाला आदर्श मानले जाते. मात्र, अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाने या विचाराला काळिमा फासत शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं -

मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे. शाळेतील वर्गखोलीतच मुख्याध्यापक दारू पिऊन झोपला होता. मेळघाटातील काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर या शिक्षकाने तिथेच लघुशंकाही केली. दारू पिऊन वर्ग खोलीत झोपला असलेल्या अवस्थेत मुख्याध्यापकाचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. अविनाश राजनकर असं दारुड्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

या घटनेनंतर सर्वत्र परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे दिवसेंदिवस मराठी शाळांची अवस्था वाईट होत असताना जे उरलंय त्याठिकाणीसुद्धा असा गलिच्छ प्रकार घडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्याध्यापकच दारु पिऊन शाळेत आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाईसाठी जिल्हा परिषद सीईओंकडे तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा - दारू पिऊन शिक्षकाने वर्गातच केली लघुशंका, अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

ऑगस्टमध्येही घडली अशीच घटना -

अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे हा धक्कादायक प्रकार घडला. येथील शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण (वय 38) याने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना शाळेला सुटी झाल्याचे सांगितले. यानंतर मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोपून गेला व तिथेच लघुशंका केली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. यानंतर पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला.

First published:

Tags: Amravati, School, School teacher