जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा, काय आहे कारण

Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा, काय आहे कारण

Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा, काय आहे कारण

राज्यातील निवासी डॉक्टरांचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यवतमाळमध्ये एका निवासी डॉक्टरावर एका रुग्णाने हल्ला केल्याने पुन्हा इशारा देण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जानेवारी : महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा दिला होता. सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत याबाबत माहिती देण्यात आली होती. दरम्यान गिरीश महाजन यांनी याबाबत बैठक घेत लवकरच यावर मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यावरून राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला होता. दरम्यान या  संपावर तोडगा निघाला असताना अचानक पुन्हा राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

जाहिरात

राज्यातील निवासी डॉक्टरांचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यवतमाळमध्ये एका निवासी डॉक्टरावर एका रुग्णाने हल्ला केला यामध्ये निवासी डॉक्टर जखमी झाल्याने निषेध करण्यात आला. आज (दि.06) या विरोधात राज्यातील सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बंधून त्याचा निषेध नोंदवणार आहेत.  

सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयात पत्रकार परिषद देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा :  अजित पवार उद्या औरंगजेबासोबत…; त्या टीकेला नितेश राणेंचं सडेतोड उत्तर

या कारणासाठी निवासी डॉक्टरांनी केला होता संप

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती झाली नाही. दरम्यान मागच्या काही       काळापासून शासनाकडे हा प्रस्ताव धुळखात पडला आहे. शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होत आहे. यावर लवकरातलवकर निर्णय घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात

सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची पदेच भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही अपुरे पदे तातडीने भरणे तसेच मागच्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांना महागाई भत्ता देण्यात आला नाही तो देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्यात यावे असे निवेदनात सांगितलं आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  अपघातानंतर धनंजय मुंडेंची प्रकृती आता कशी? अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे, अशातच उपलब्ध डॉक्टरांवर अधिक ताण येतोय. त्यामुळे रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात