नागपूर, 31 मार्च : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. वाघाच्या हल्ल्यात 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी राखीव वनपरिक्षेत्रातील मौदी जंगलात वाघाने तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुणाचा बळी गेला आहे. गौरीशंकर श्रीभद्रे, वय 29 वर्ष, रा. मौदी ता. रामटेक जिल्हा नागपूर असं वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
चारा आणण्यासाठी गेला होता जंगलात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गौरीशंकर श्रीभद्रे हा गुरुवारी सकाळी आपल्या गावालगतच्या राखीव जंगलात बकऱ्यांसाठी लागणारा चारा झाडांचा पाला आणण्यासाठी गेला होता. पण बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्यानं नागरिकांनी शोधाशोध सुरू केली. नागरिक जंगलात पोहोचल्यानंतर त्यांना समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला. गौरीशंकर नागरिकांना जंगलात मृतावस्थेमध्ये आढळून आला. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या.
मृतदेहाशिवाय अंत्यसंस्कार, गावातून दररोज संध्याकाळी निघायची अंत्यसंस्कार, समोर आलं भयानक सत्य
नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पहाणीत वाघाच्या पायचे ठसे आढळून आले आहेत, तसेच त्याच्या शरीरावर ज्या जखमा आहेत, त्या वाघानेच केल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, वनविभागाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Forest, Nagpur, Nagpur News