मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रेमासाठी आईचाच गळा घोटला; लेकीच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ

प्रेमासाठी आईचाच गळा घोटला; लेकीच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ

आईला मुलगी उर्मिलाचे बिनधास्त वागणे खटकत होतं. त्यामुळे त्या उर्मिलाला सातत्याने टोकायच्या.

आईला मुलगी उर्मिलाचे बिनधास्त वागणे खटकत होतं. त्यामुळे त्या उर्मिलाला सातत्याने टोकायच्या.

आईला मुलगी उर्मिलाचे बिनधास्त वागणे खटकत होतं. त्यामुळे त्या उर्मिलाला सातत्याने टोकायच्या.

  • Published by:  Meenal Gangurde
महेश तिवारी/ गडचिरोली, 19 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आईकडून तिला सतत होणारी रोकटोक आणि आईचा कडक व्यवहारामुळे त्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अहेरी येथील निर्मला आत्राम हिचे पती पोलीस दलात असताना वीस वर्षांपूर्वी माओवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. त्या घटनेनंतर निर्मला यांनी स्वतःच्या मुलीसह अहेरी येथे राहून घरकाम करून स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह केला. आज पहाटे उर्मिलाला एका तरुणासोबत संशयास्पद अवस्थेत फिरताना पोलिसांनी पाहिलं. यावेळी तिने आईचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं तर घरात निर्मला या मृतावस्थेत दिसल्या. पोलिसांना उर्मिलावरच संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच मुलगी उर्मिलाने आपल्या प्रियकर रुपेश येनगंदलवारला सोबत घेऊन आईची गळा दाबून हत्या केल्याचं कबुल केलं. BREAKING : बारामतीत हायस्कुलमध्ये मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलावर अल्पवयीन मुलांचा हल्ला, पालकाचा मृत्यू आईला मुलगी उर्मिलाचे बिनधास्त वागणे खटकत होतं. त्यामुळे त्या उर्मिलाला सातत्याने टोकायच्या. हे मुलीला अजिबात आवडत नव्हतं. म्हणून तिने प्रियकर रुपेश येनगंदलवार याच्या मदतीने आईची गळा दाबून हत्या केली. वडिलाच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरीला लागण्याची तयारी करणा-या उर्मीलाला जन्मदात्या आईची हत्या केल्याने तुरुगांची हवा खाण्याची वेळ आली आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
First published:

Tags: Crime news, Mother, Murder

पुढील बातम्या