नागपूर, 29 : नागपूर आणि विदर्भातील उन्हाळा हा सहसा तीव्रच असतो. मात्र, यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र आहे. विदर्भात गेले अनेक दिवस तापमान सतत 42 ते 43 अंशांच्या वर आहे. माणूसच नाही तर निसर्गावरही याचा गंभीर परिणाम होत आहे. याची प्रचिती देणार एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तापमानामुळे एका टेम्पोतून वाहतूक केल्या जाणाऱ्या कोंबडीच्या अंड्यांतून चक्क पिल्ल बाहेर येत आहेत. काय आहे प्रकार? मुळात अंड्यातून पिल्ल बाहेर येण्यासाठी उब मिळणं गरजेच आहे. मात्र, वैदर्भीय तापमानामुळे अंड्याला कोंबडी शिवाय तापमानातील ऊब मिळून पिल्ल बाहेर येत आहेत. काल दुपारी नागपूरवरुन भंडाऱ्याकडे जाणाऱ्या एका अंड्याच्या गाडीत असा प्रकार घडला. नागपुरातील महामार्ग पोलिसांनीच हा व्हिडिओ शुट केला आहे. अंड्याची ती गाडी नागपुरातून भंडाऱ्यातील हॅचरीजमध्ये जात असताना ही घटना समोर आली आहे. ते काही असलं तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Video : विदर्भाच्या उकाड्यानं चालत्या गाडीत अंडी उबली#nagpur #summer pic.twitter.com/HRijGsW4CO
— News18Lokmat (@News18lokmat) May 29, 2023
ऊन जरा जास्तच हाय नागपुरात यंदा पारा तीन वेळा 45 अंश किंवा त्याहून अधिक गेला. नागपुरातील उच्चांकाचा विक्रम यंदा तुटलेला नसला तरी उष्ण दिवसांच्या आकड्यांवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. हे चित्र एकट्या नागपूरचे नाही. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यावर शास्त्रज्ञांमध्ये आणि हवामान तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र अलीकडच्या काळात जगभरात सर्वच ठिकाणी तापमानात वाढ होऊ लागली असून ही तापमानवाढ सामान्य नाही, यावर आता एकमत होऊ लागले आहे. वाचा - फडणवीसांच्या 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांना सतावतेय ‘ती’ भीती उष्णतेच्या लाट उष्णतेच्या लाटेची ही परिस्थिती केवळ भारत, पाकिस्तान किंवा सौदी अरब या भागातच नाही. जगभरातील अनेक देशांना यंदा तीव्र उष्णतेची लहर सहन करावी लागली आहे. उत्तरेकडील देशांमध्येसुद्धा यंदा तापमानवाढ बघण्यास मिळाली. डिसेंबर 2018 मध्ये समोर आलेल्या एका शास्त्रीय अभ्यासानुसार आर्क्टिक महासागरातील जुना आणि अतिशय जाड असलेला 95 टक्के बर्फ नाहीसा झाला आहे. उष्णतेच्या लाटेमागील महत्त्वाचे कारण हे निसर्गातील मानवी हस्तक्षेप अर्थात प्रदूषण आणि वृक्षतोड हे आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे हा बदल होत असल्याचे दावे करणारे विविध शोधप्रबंध प्रकाशित होऊ लागले आहेत.