विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 3 जून: सर्वसाधारण उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील उन्हाळा हा सहसा तीव्रच असतो. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्हातील तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या तीव्रतेने जिथे मनुष्याच्या जीवाची लाही-लाही होत असताना या उन्हाचा फटका मुक्या जनावरांना देखील बसतो आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावार तुफान व्हायरल होत आहे. चालत्या टेम्पोत अंड्यातून पिल्लं बाहेर या व्हिडिओ मध्ये एक टेम्पो कोंबड्याच्या अंड्याची वाहतूक करत असताना त्या अंड्यातून चक्क कोंबडीचे पिले बाहेर येत आहेत. वायरल होणाऱ्या या व्हिडीओ मुळे मात्र सोशल मीडियावर विदर्भातील उन्हाळा आणि घडलेला हा प्रकार चांगलाच चर्चेत आहे. मात्र या व्हिडिओ मागील सत्यता काय आहे ? याबाबत कुक्कुटपालन संशोधन व प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. मुकुंद एम. कदम यांनी अधिक माहिती दिली आहे.
तापमानाचा परिणाम गेल्या काही आठवड्यांपासून नागपूरसह विदर्भातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानातील उच्चांक आणि मध्येच येणारा अवकाळी पाऊस असं संमिश्र वातावरण आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील अंडी ही खाण्यासाठी बाजारात उपलब्ध असतात ती नसावीत. तर बॉयलर पिलांसाठीची असावीत. ती कुठेतरी साठवून ठेवलेली असावीत. वातावरणातील आद्रता आणि उष्णता असे अंडी उबवण्यासाठी वातावरण पुरक बनल्याने या अंड्यांतून पिलं बाहेर आली असावीत, असे डॉ. कदम म्हणतात. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यासाठी लाागतात 21 दिवस अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यासाठी सर्वसाधारणपणे 18 ते 21 दिवसांचा कालावधी लागतो. व्हिडिओ मधील अंडी ही 21 दिवसांच्या आसपास असावीत. पोषक वातावरण मिळाल्याने अंड्यातून ही पिल्ले बाहेर येत आहेत. योग्य वेळेनुसार आणि ठराविक कालावधीत अंड्यातून पिल्ले बाहेर येत असतात. उन्हाचा थेट परिणाम हा या अंड्यांवर होत नसतो, अशी माहिती डॉ. कदम यांनी दिली. Vat Purnima 2023 : कुटुंबावर आलं संकट, पण ती डगमगली नाही, रिक्षा चालवून सांभाळला संसार! आरोग्यास कुठलाही धोका नाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या या व्हिडिओमुळे काही गैरसमज होत आहेत. तरी मात्र अंड्याचे पदार्थ आवडणाऱ्यांनी कुठलीही भीती बाळगू नये. कारण जी अंडी आपण खातो ती ही पांढरी अंडी नाहीत. आपण खात असलेल्या अंड्यांना इन्फटाइल अंडी असे म्हणतात. त्यात जीव नसतो आणि ती अंडी दिसायला पांढऱ्या रंगाची असतात. व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहेत ती अंडी ही फटाइल अंडी आहेत. ज्यामध्ये जीव असून त्यातून बॉयलर पिल्ले जन्माला येतात. त्यामुळे काळजी करण्याचे कुठलेही कारण नसून या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यामागे मुख्यतः त्याला योग्य कालावधी आणि अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी लागणारे पोषक वातावरण कारणीभूत आहे, असे कदम यांनी सांगितले.

)







