जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Vat Purnima 2023 : कुटुंबावर आलं संकट, पण ती डगमगली नाही, रिक्षा चालवून सांभाळला संसार!

Vat Purnima 2023 : कुटुंबावर आलं संकट, पण ती डगमगली नाही, रिक्षा चालवून सांभाळला संसार!

मुलाच्या शिक्षणासाठी आई रिक्षाचालक बनली.

मुलाच्या शिक्षणासाठी आई रिक्षाचालक बनली.

काही महिला स्वतः ब्रह्म सावित्री होऊन आपला घर संसार सांभाळतात. डोंबिवलीत देखील अशीच एक सावित्री आहे.

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

डोंबिवली, 3 जून :  जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वट सावित्रीचे व्रत करतात. यातील काही महिला स्वतः ब्रह्म सावित्री होऊन आपला घर संसार सांभाळतात. कष्ट उपसून घर सावरतात आणि घरातील माणसांचा आधार बनतात. डोंबिवलीत देखील अशीच एक सावित्री आहे. ही सावित्री आपला संसार सांभळण्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून तुम्ही त्यांना ‘खरी सावित्री’ नक्की म्हणाल. संसारासाठी कष्ट शुभदा सातार्डेकर असं या झुंजार महिलेचं नाव आहे. त्यांचे पती लहान-मोठी कामं करतात. शुभदा यांनी संसार चालवण्यासाठी लग्नानंतरच वेगवेगळी काम केली आहेत. त्या सुरूवातीला मुंबईत सासूबाईच्या खानावळीच्या व्यवसायाला मदत करत. लग्नानंतर काही वर्षांनी त्या डोंबिवलीत स्थायिक झाल्या.

News18लोकमत
News18लोकमत

कशा बनल्या रिक्षाचालक? मुलाच्या शिक्षमासाठी शुभदा यांनी प्रेसमध्ये काम केलं. तसंच अनेक लहान-मोठे व्यवसाय केले. मुलाच्या शिक्षणाला त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. शुभदा या पेपर स्टॉल चालवत होत्या. पण, कोरोनामुळे त्यांच्या या व्यवसायात मोठी पिछेहाट झाली. उत्पन्न कमी झाले. त्यानंतर त्यांनी ऑटो रिक्षा चालवण्याचं ठरवलं. शुभदा यांच्या रिक्षा चालवण्याला मुलाचा विरोध होता. पण, महिनाभरातच त्यांनी उत्तम पद्धतीनं रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. ते पाहून ‘माझी आई रिक्षा चालवते,’ असं मुलगा अभिमानानं सांगतो, अशी माहिती शुभदा यांनी दिली. सकाळी 9.30 पासून शुभदा रिक्षा घेऊन घराबाहेर पडतात. दुपारी काही काळ आराम केल्यानंतर 11 पर्यंत त्या रिक्षा चालवतात. सतत रिक्षा चालवल्यानं खांद्यांना त्रास होतो, पण संसाराचा गाडा चालवण्यासाठी हे कष्ट करण्याची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video शुभदा यांच्या कष्टाचं आता चीज झालंय. त्यांचा मुलानं शिक्षण पूर्ण केलं असून तो मुंबईतील हॉटेलमध्ये शेफ आहे. मुलाच्या या नोकरीचा आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात