चंद्रपूर, 24 जुलै : पत्नीला पळवून नेलं, म्हणून निराश झालेल्या एका पतीने पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. काही दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आणि अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. ५० वर्षीय मृतक रामभाऊ पाटील हे माजरी कॉलरी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्यामध्ये मृतकाच्या मुलाचे आरोपी आशिष पेटकर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे आणि त्याने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. त्याचा राग मनात धरुन आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने पुरग्रस्त छावणीत प्रवेश केला आणि मृतकाला चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याजवळ नेले आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.