विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 4 मे: आकाशगंगेत प्रत्येक क्षणाला कुठली तरी खगोलीय घटना घडत असते. आकाशगंगेतील प्रत्येक हालचालीशी मानवी जीवनाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काहीना काही संबंध असतो. खगोल अभ्यासकांसाठी महत्त्वाची असलेली एक घटना म्हणजे ग्रहण. दरवर्षी कमीत कमी चार ग्रहणे होत असतात. भरतातून दिसणारं यंदाचं पहिलं छायाकल्प चंद्रग्रहण येत्या 5 रोजी होणार आहे. त्यामुळे खगोलअभ्यासक, खगोलप्रेमींसह सर्वांनाच या छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध लागले आहेत. सर्वांनी या नयनरम्य घटनेचं साक्षीदार व्हावं असं आवाहन नागपुरातील प्रा. सुरेश चोपणे यांनी केलं आहे. भारतातून दिसणार ग्रहण येत्या 5 मे 2023 रोजी भारतातून छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातून दिसणारं हे या वर्षीचे पाहिले ग्रहण असेल. या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जात असल्याने चंद्र किंचित अंधुक होतो. म्हणून त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. 20 एप्रिल रोजी अतिशय सुरेख असे हायब्रीड सुर्यग्रहण झाले होते. परंतु ते भारतातून दिसले नाही. मात्र 5 मे रोजी होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण फारसे सुंदर दिसत नसले तरी खगोलीय दृष्टीने या ग्रहणाचे महत्त्व आहे.
यंदा दोनच ग्रहणं भारतीयांना पाहता येणार मागील 2 वर्षापासून भारतात फारसे ग्रहण अनुभवण्याची संधी मिळाली नाही. 2023 या वर्षातील 4 ग्रहणांपैकी केवळ दोन ग्रहणं भारतातून बघता येणार आहेत. गेल्या 20 एप्रिल 2023 रोजी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतात दिसले नाही. मात्र प्रसारमाध्यमांच्या मार्फत हे ग्रहण सर्वांना पाहता आले. येत्या 5 मे रोजी होणारे छायाकल्प ग्रहण बघण्याचा एक अद्भुत योग या निमित्ताने उपलब्ध झाला आहे. छायाकल्प ग्रहण म्हणजे काय ? खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून(Umbra) जातो. त्यामुळे चंद्र काळा, लाल दिसतो. परंतु छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र काळा, लाल दिसत नाही. तो नियमित पौणिमेच्या चंद्रासारखाच परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास थोडा काळपट झालेला दिसतो. Nagpur News : वायू प्रदूषण मोजणं होणार सोपं आणि अचूक, पाहा काय आहे नवं संशोधन, Video ग्रहण कसे घडते? जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात. चंद्र ग्रहणावेळी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावली असतात. गडद सावली आणि उपछाया. गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चांद्रग्रहण घडते. ग्रहण कुठून आणि केव्हा दिसेल? छायाकल्प चंद्रग्रहण हे आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पॅसिफिक, इंडीयन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल. हे ग्रहण 5 मे ला भारतीय वेळेनुसार 8.44 वाजता सुरू होईल. ग्रहणमध्य 10.52 तर ग्रहण समाप्ती 1.10 वाजता होईल. नागपूरच्या कलाकारानं तयार केला जगातील सर्वात लहान चरखा! निर्मितीचा उद्देशही आहे खास, Video निरीक्षण कसे करावे ? छायाकल्प चांद्रग्रहणात चंद्र पूर्ण दिसतो. परंतु त्याचे तेज ग्रहण काळात 4 ते 5 % ने कमी होते किंवा गडद छायेकडील चंद्रबिंबाचा थोडा भाग किंचित काळपट दिसतो. बारकाईने पाहिल्यास हा फरक जाणवतो. अन्यथा नियमित निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तींना चांद्रग्रहण लागले हे कळत नाही. आकाश ढगाळ नसेल तर साध्या डोळ्याने घरूनच ग्रहण बघावे. दुर्बीण किंवा द्विनेत्री असल्यास उत्तम असल्याची माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.