विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 22 मार्च : वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. गुढीपाडव्याचा सण देशभर वेगवेगळ्या नावानं साजरा होतो. त्याचबरोबर या दिवशी सुरू होणाऱ्या चैत्र महिन्यात नवरात्राचीही परंपरा आहे. महाराष्ट्राच्या शेजारच्या छत्तीसगड राज्यातील रांजनादगाव जिल्ह्यातील माता बम्लेश्वरी देवी हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. या देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येतात.
तब्बल 1, 610 फूट टेकडीवर आणि निसर्गानं नटलेला हा परिसर अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. शारदीय नवरात्रौत्सव आणि चैत्र नवरात्रच्या प्रसंगी बम्लेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. चैत्र नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने डोंगरगड रेल्वेस्थानकावर 22 ते 30 मार्च पर्यंत 8 रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
चैत्र नवरात्री आणि रामनवमीचा विशेष संबंध; ...म्हणून प्रभू श्रीरामाचीही केली जाते पूजा
कोणत्या गाड्यांना थांबा?
12812 हटिया कुर्ला एक्सप्रेस रात्री 8:25 ला डोंगरगड रेल्वे स्थानकावर येईल आणि दोन मिनिटाच्या थांब्यानंतर पुढील प्रवासाला निघेल. 12811 कुर्ला हटिया एक्सप्रेस दुपारी चार 4.33 ला येईल आणि 4.35 ला पुढे निघेल.20813 पुरी जोधपूर एक्सप्रेसचे सकाळी 7.27 वाजता आगमन होईल आणि 7.29 वाजता प्रस्थान करेल. 20814 जोधपूर-पुरी एक्सप्रेस सायंकाळी 5:38 वाजता स्थानकात पोहोचेल आणि 5.40 वाजता प्रस्थान करेल.
12146 पुरी कुर्ला एक्सप्रेस दुपारी 2.28 वाजता येईल आणि 2. 30 मिनिटाला वाजता पुढच्या प्रवासाला निघेल 12145 कुर्ला पुरी एक्सप्रेसचे दुपारी 1 वाचून 13 मिनिटांनी डोंगरगडला आगमन होईल आणि येथून 1.35 वाजता ती प्रस्थान करेल. 12851 बिलास्पुर चेन्नई एक्सप्रेस दुपारी 12.21 वाजता येईल आणि 12.23 वाजता तिथून निघेल 12852 चेन्नई बिलासपूर एक्सप्रेसचे सकाळी 10.53 ला आगमन होईल आणि 10.55 प्रस्थान करेल.
स्वप्नातील 'त्या' निरोपानंतर उभं राहिलं नरसिंहाचं मंदिर, पाहा अख्यायिका! Video
भाविकांच्या सोयीसाठी छत्तीसगडमधील भाविकांना देखील रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष सोय व्हावी म्हणून 08742 गोंदिया दुर्ग आणि 08741 दुर्ग गोंदिया ही रेल्वे गाडी या कालावधीत रायपूर पर्यंत धावणार आहे त्यामुळे रेल्वे मार्गे बमलेश्वरीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Local18, Nagpur