नागपूर, 16 जानेवारी : विद्यार्थ्यांनी 150 पिको सॅटेलाईट बनविले असून हा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग आहे. येत्या 19 फेब्रुवारीला तामिळनाडूतील पत्तीपुरम येथून हे सॅटेलाईट अवकाशात झेप घेणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. या प्रकल्पासाठी नागपुरातील महापालिकेच्या 20 गुणवंत विद्यार्थिनींची निवड झाली आहे. हा जगातील पहिला शैक्षणिक प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. या मिशनमध्ये सहभागी झालेला विद्यार्थ्यांना इको सॅटेलाईट व रॉकेट बनवण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून रॉकेट सायन्स सारखे अवघड विषय शिकण्याची संधी या निमित्याने उपलब्ध झाली आहे. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे या उद्देशाने आयोजित या मिशनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पिको सॅटेलाईट व रॉकेट बनवण्याची ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सॅटेलाईट बनवण्याची कार्यशाळा घेतली जाणार आहे.
मागील लॉकडाऊनमध्ये आम्ही एपीजे अब्दुल कलाम मिशन यांच्यावतीने स्पेस झोन ऑफ इंडिया, मार्टिन ग्रुप ऑफ तामिळनाडू यांच्या संयोगाने एक उपक्रम हाती घेतला होता. त्याचे नाव एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्चिंग प्रोग्राम असे होते. त्याचाच हा पुढचा भाग आहे. दहा दिवस ऑनलाईन क्लास 19 फेब्रुवारीला 150 पिको सॅटेलाईट पूर्ण भारताचे विद्यार्थी तयार करतील. त्यात आमच्या महापालिकेच्या सुमारे 10 शाळेतील 20 विद्यार्थ्यांचे निवड करण्यात आली आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे. यासाठी शिक्षण अधिकारी राजेंद्र पुसेकर सर आणि सह आयुक्त राम जोशी सर यांचे आम्हाला सर्वांर्थाने सहकार्य, सहभाग आणि प्रोत्साहन लाभले आहे. विद्यार्थ्यांना दहा दिवस ऑनलाईन क्लास च्या माध्यमातून सॅटेलाईट कसे बनवतात? सॅटेलाईट काय काम करतो ? त्याचे वजन, जोडणीबद्दल माहिती दिली जात आहे. 5000 विद्यार्थ्यांचा समावेश संपूर्ण भारतातून सुमारे 5000 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून त्यातून एक परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातील उत्तीर्ण शंभर विद्यार्थ्यांची निवड या रॉकेट लॉन्चिंगच्या प्रोग्राममध्ये केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग असून या मिशनची नोंद जगातल्या पाच रेकॉर्डमध्ये होणार असून त्यात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा समावेश आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेच्या शाळेच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिष्ट यांनी दिली.