बुलडाणा, 29 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. याबाबत कायदे कडक करूनही घटनांमध्ये अधिक वाढ होत आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातही गुन्हेगारी, अत्याचार, यासारख्या घटना समोर येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याचा गैरफायदा घेत काकानेच पुतणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने चिखली परिसरात संताप व्यक्त करण्यात आला. याचबरोबर काकाविरूद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नातेसंबंधांचा गैरफायदा घेत 15 वर्षीय पुतणीवर चुलत काकाने लैगिक अत्याचार गेल्याची घटना चिखली शहरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. नराधम काकाने आपल्या 15 वर्षीय पुतणीला गाडीवर बसवून बुलडाणा येथे नेले. त्या ठिकाणी एका लॉजवर नेऊन मुलीवर अत्याचार केला. सदर घटनेची माहिती मुलीने आपल्या कुटुंबात सांगितली.
हे ही वाचा : अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात मित्राच्या पत्नीवर बलात्कार
त्यावरून नातेवाईकांनी त्या नराधम काका विरुद्ध चिखली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
बीडमध्येही एक धक्कादायक घटना समोर
बीडमधील पिंपळनेरमध्ये प्रेमियुगुलाने आत्महत्या केली आहे. अनैतिक संबंधातून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दोघांनी एकाचवेळी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पुरूषाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर महिलेने विहीरीत उडी घेत आपले जीवन संपवले.
हे ही वाचा : ATM कार्डसोबत हातचलाखी करुन लुबाडणारी टोळी गजाआड; ट्रॅप असा की येणार नाही संशय
याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मोहन बाबूराव नरवडे अस मयत पुरुषाचे नावं आहे. कौसाबाई जाधव असे महिलेच नाव आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana, Buldhana news, Rape, Rape case, Rape news, Rape on minor