धुळे, 27 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढत होत आहे. यात आता धुळे जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरपूर पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 94 एटीएम कार्डसह साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
अटक केलेल्या चारही आरोपींवर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकही केले.
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही तरूण मुंबई पासिंगच्या वाहनाने संशयितरित्या फिरत आहेत, अशी माहिती काल सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद येथे जाऊन संशयितांचा आणि वाहनाचा शोध सुरू केला. त्यावेळी साखर कारखान्याजवळ एमएच बी झेड 3439 गाडी आणि त्यात चार सापडले.
हेही वाचा - अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात मित्राच्या पत्नीवर बलात्कार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Crime news, Dhule