रवी गुलकरी, प्रतिनिधी नागपूर, 27 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील रुई जंगलात प्रियकराने आपल्याच विवाहित प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली. प्रेयसीचे नाव सुषमा काळबांडे असे आहे. सुषमा विवाहित होती. तिला पतीसोबत एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, तरीसुद्धा सुषमाचे दीपक इंगळे नावाच्या व्यक्तीसोबतस विवाहबाह्य संबंध होते. दोघेही दिघोरी गावचे रहिवासी आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याने दीपक सुषमाच्या घरी यायचा. दीपक जेव्हाही सुषमाच्या घरी यायचा तेव्हा ती त्याला भाऊ म्हणायची. सुषमा आणि दीपक दोघेही एकत्र वेळ घालवण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील कापसाच्या जंगलात भेटायचे. पोलिस तपासानुसार, 23 मार्च रोजी दोन्ही भाविक नेहमीप्रमाणे जंगलात पोहोचले. सुषमाचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचे दीपकला समजले आणि दीपकने या नात्याला विरोध केला. यावरुन जंगलात दोघांमध्ये वाद झाला. यानंतर या वादाचे रुपांतर भयानक घटनेत घडले. दीपकने सुषमाची दगडाने ठेचून हत्या केली. तसेच सुषमाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर घटनास्थळावरून पळ काढला. आई-मुली आणि पती-पत्नी चालवत होते सेक्स रॅकेट…, पोलिसांनी असा रचला सापळा तर दुसरीकडे 23 तारखेच्या रात्री आणि 24 तारखेच्या दुपारपर्यंत सुषमा घरी परतली नाही. त्यामुळे सुषमा बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल करण्यात आला. कुटुंबीयांशी चौकशी केली असता दीपक इंगळेच्या येण्या-जाण्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी दीपकला चौकशीसाठी बोलावण्यात आले असता, चौकशीदरम्यान दीपकने सुषमाच्या हत्येची कबुली दिली. दीपककडून हत्येची कबुली ऐकल्यावर मृताच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. हत्येचा उलगडा झाल्यानंतर दोन दिवसांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेहातून दुर्गंधी येत होती. दोघेही या जंगलात अनेकदा यायचे, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. तसेच या दोघांमध्ये 4 वर्षांपासून प्रेमसंबंध संबंध होते. मात्र, प्रेयसी सुषमा हिचे आणखी कुणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यावर दीपक ते सहन झाल्याने त्याने तिची हत्या केली. याप्रकरणी हिंगणा आणि वाठोडा पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.