मराठी बातम्या /बातम्या /देश /आई-मुली आणि पती-पत्नी चालवत होते सेक्स रॅकेट..., पोलिसांनी असा रचला सापळा

आई-मुली आणि पती-पत्नी चालवत होते सेक्स रॅकेट..., पोलिसांनी असा रचला सापळा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आई-मुलगी आणि पती-पत्नीचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Ambala, India

अंबाला, 25 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑपरेशन क्लीन अंतर्गत महेश नगर पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन पुरुष आणि तीन महिलांना अटक केली आहे. तसेच दहा मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पहिली घटना ही अंबाला कॅन्टच्या पूजा विहार जवळची आहे. याठिकाणी एक जोडपे सेक्स रॅकेट चालवत होते. हे आरोपी पती-पत्नी बाहेरून मुली आणून त्यांना येथे अनैतिक कृत्ये करायला लावत. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक बनवून त्यांच्या घरावर छापा टाकला आणि तेथून दोन मुलींना ताब्यात घेतले.

यातील एक मुलगी चंदीगडजवळील मोहाली येथील तर दुसरी युपीमधील गाझियाबाद येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. डीएसपी अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पती-पत्नीसह दोन मुलींना अटक करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

" isDesktop="true" id="855444" >

यासोबतच दुसरीकडे, वेश्या व्यवसायाच्या आणखी एका प्रकरणात, दोन दिवसांपूर्वी अंबाला कॅन्टच्या न्यू दयाल बागमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला आणि तिच्या मुलीला अटक केली. हे लोक बाहेरून मुली आणून येथे अनैतिक काम करायला लावायचे. यामध्ये आई आणि मुलीसह बाहेरून आणलेल्या 8 मुलींना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, महिलेची एक मुलगी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाली.

अनैतिक संबंध आणि तंत्र-मंत्रांच्या चक्करमध्ये आईचे भान हरपले, दोन निष्पाप मुलांचा घेतला जीव

तर दुसरीकडे फरार आरोपी मुलीचे नाव या प्रकरणातून बाहेर काढण्याच्या नावाखाली अमरजीत नावाच्या व्यक्तीने आरोपी आई-मुलीकडून एक लाख रुपये घेतले होते. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून 46 हजार रुपये जप्त केले. पोलीस अजूनही त्याची चौकशी करत आहेत.

डीएसपी यांनी सांगितले की, सेक्स रॅकेट चालवण्याच्या दोन्ही प्रकरणांमध्ये पकडलेल्या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल आणि रिमांडची मागणी केली जाईल. यासोबतच आणखी किती लोक देहव्यापारात गुंतले आहेत, याचाही शोध घेण्यात येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Local18, Sex racket