मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : अचानक बुलेरो आली, कारला धडकली, पाहता-पाहता फुटपाथवर चढली आणि मोठा गदारोळ, नागपुरात विचित्र अपघात

VIDEO : अचानक बुलेरो आली, कारला धडकली, पाहता-पाहता फुटपाथवर चढली आणि मोठा गदारोळ, नागपुरात विचित्र अपघात

नागपूरच्या पंचशील चौकाजवळ विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या पंचशील चौकाजवळ विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या पंचशील चौकाजवळ विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर, 22 जुलै : नागपूरच्या पंचशील चौकाजवळ विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव आलेल्या बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोराची धडक दिली. त्यानंतर ती बुलेरो थेट फुटपाथवर चढली. त्यानंतर ती गाडी पुन्हा रोडवर पलटत आली आणि या गाडीने उभ्या असलेल्या आणखी एका बाईक आणि सायकलला चिरडलं. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ अतिशय थरारक असा आहे. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.

या दुर्घटनेतून एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले. पण चारचाकी गाडीचं प्रचंड नुकसान झालं. तसेच दुकानासमोर असलेल्या वस्तूंचं सुद्धा नुकसान झालं आहे. दुर्घटनेत कार, बाईक आणि सायकलचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

(200 दिवसांत 142 रुग्ण, 2 आठवड्यातच 7 बळी; राज्यात कोरोनासह H1N1 Virus चा प्रकोप)

दरम्यान, या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. बोलेरो गाडीचे ब्रेक फेल झाले की चालकाची चुकी होती याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पण संबंधित घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेत एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे गाडीच्या पाठिमागे भरपूर नागरीक धावताना देखील दिसत आहेत. याचा अर्थ ही गाडी भरधाव वेगात होती आणि ती चालकाचं तिच्यावरील नियंत्रण सुटलं होतं. त्यामुळे गाडी कुठेही वळू शकली असती. याची चाहूल रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या नागरिकांना झाली. त्यानंतर रस्त्यावर नागरिकांची धावपळ सुरु झाली.

याच दरम्यान गाडीवर नियंत्रण करणं चालकाच्या हाताबाहेर गेलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कारला धडकली. त्यांनंतर ती थेट फुटपाथवर चढली. यावेळी ती काही दुचाकींनादेखील धडकली. त्यानंतर एका दुचाकीला आणि सायकलला तिने चिरडलं आणि तिथेच उभी राहिली. गाडी बंद झाल्यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

First published: