नागपूर, 10 जुलै : उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील सभेत देवेंद्र फडणवीस नागपूरचे कलंक असल्याची टीका केली होती. या टीकेनंतर नागपुरात भाजप आक्रमक झाला आहे. नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागली होती. ही होर्डिंग भाजप कार्यकर्त्यांनी फाडली आणि होर्डिंग पायदळी तुडवले. एवढच नाही तर पोस्टरला काळं फासत भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध नोंदवला. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? ‘देवेंद्र फडणवीस यांची हालत विचित्र झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. झालं आहे काही तरी नक्की पण सांगण्यासारखं नाहीये. उपमुख्यमंत्र्यांची एक क्लिप आहे. मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण दोन जणांना घेऊन आलो, असं ते म्हणत आहेत’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिपही दाखवली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीशी युती होणं शक्य नाही, नाही नाही नाही. आपदधर्म नाही शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एकवेळ रिकामे राहू, एकवेळ सत्तेशिवाय राहू, अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असं म्हणत आहेत. ही क्लिप दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला लागलेला कलंक म्हणाले. फडणवीसांचा पलटवार दुसरीकडे या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. द्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचे दोन व्हिडिओ आणि आठ मुद्दे त्यांच्या ट्वीटमध्ये टाकले आहेत. ‘कलंकीचा काविळ’ ! 1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी! असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
‘कलंकीचा काविळ’ !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 10, 2023
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान… pic.twitter.com/efd6rdG8d2
गडकरींनीही सुनावलं दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही,’ असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.