जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात असतो भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा

Video : कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात असतो भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा

Video : कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात असतो भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा

Bhulabai Festival : विदर्भात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो. पाहा काय आहे या उत्सवाची परंपरा आणि इतिहास

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 8 ऑक्टोबर : विदर्भात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो. नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा करण्यात येणारा हा उत्सव आहे. हा आगळावेगळा उत्सव पारंपारिक पद्धतीने लहान मुली व महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात. मध्यरात्री पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब बासुंदीत पडले की देवाला नेवैद्य दाखवून बासुंदी सर्वांना प्रसाद म्हणून वाटण्यात येते. महाराष्ट्र हे विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक समृद्ध अशा वारसासह विविध लोकसंस्कृतीचा मेळ असलेले मराठी राज्य आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपारिक जीवनशैलीत कृषी संस्कृतीचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सण उत्सव हे शेतीशीच निगडित आहेत. शेती हा भारताचा कणा असून आजही महाराष्ट्रात शेतीशी निगडित अनेक लोकोत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. शिवपार्वतीसह बाल गणेशाची पूजा   कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विदर्भात भुलाबाईचा सण साजरा केला जातो. पौर्णिमेला माहेरवाशिणी भुलाबाई म्हणजेच पार्वती आणि भुलोजी म्हणजेच सांबसदाशिव शंकर आणि संगतीला बाल गणेश यांची पूजा केली जाते. याप्रसंगी खास वैदर्भय बोली भाषेत अनेक प्रकारे गाणे म्हटले जातात. सोबतीला अनेक गमतीजमती देखील केल्या जातात.

     बासुंदीचा नेवैद्य खरिपाच्या पिकांची पूर्ण कामे झाल्यानंतर मोठ्या मेहनतीने पिकवलेले पीक दसरा दिवाळीपर्यंत तयार झालेले असते. नव्यानं हाताशी आलेल्या या पिकांचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा एक लोक उत्सवच असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अंगणात मोठे भांड्यात दूध तापवून त्यांची बासुंदी करण्यात येते. मध्यरात्री पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब बासुंदीत पडले की देवाला नेवैद्य दाखवून बासुंदी सर्वांना प्रसाद म्हणून वाटण्यात येते. Kojagiri Purnima : तुळजाभवानीच्या दर्शनाची आस… 4 वर्षांची चिमुकली पायी करतेय प्रवास, Video खिरापतीतून मनोरंजन उत्सवातील गमतीचा आणि मनोरंजनाचा विषय म्हणजे “खिरापत”.  खिरापत म्हणजे एका बंद डब्यात एखादी खाद्य पदार्थ लपवून तो पदार्थ फक्त डबा हालवल्या नंतर होणाऱ्या आवाजाने ओळखायचा. विविध प्रकारचे पदार्थ नुसत्या आवाजावरून ओळखणे म्हणजे फार गमतीचा विषय असतो. हे खिरापत अचूक ओळखणाऱ्याला तो प्रसाद अधिक मिळतो. काळाप्रमाणे यात थोड्या थोडक्या प्रमाणात बदल झाला असला तरी ही संस्कृती आजाही आपले अस्तित्व टिकवून आहे.   मूर्ती विक्रेत्यांना आर्थिक हातभार भुलाबाई उत्सवामुळे मूर्ती घडवणाऱ्या आणि विकणाऱ्या अनेक कुटुंबीयांना काही अंशी आर्थिक हातभार लागतो. शंकर पार्वती आणि बाल गणेश यांची विविध आकाराची मूर्ती दरवर्षी पुजली जाते. यंदा बाजार मूर्तीने सजला आहे आणि ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात