जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kojagiri Purnima : तुळजाभवानीच्या दर्शनाची आस... 4 वर्षांची चिमुकली पायी करतेय प्रवास, Video

Kojagiri Purnima : तुळजाभवानीच्या दर्शनाची आस... 4 वर्षांची चिमुकली पायी करतेय प्रवास, Video

चार वर्षांची रेणुका पायी तुळजापूरला निघाली आहे.

चार वर्षांची रेणुका पायी तुळजापूरला निघाली आहे.

Tuljabhavan Devi : नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यासाठी भाविक सोलापुरवरून तुळजापूरला निघाले आहेत.

  • -MIN READ Solapur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    सोलापूर, 08 ऑक्टोबर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाच देवस्थान असलेले श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्त आई राजा उदो उदो… सदानंदीचा उदो उदो’चा गजर करत निघाले आहेत. उद्या ( रविवार) कोजागिरी पौर्णिमा असल्याने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हे भाविक जात आहेत. नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने सोलापुरात दाखल झाले असून ते श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला निघाले आहेत. याचं भाविकांसोबत NEWS 18 लोकमतच्या प्रतिनिधीने संवाद साधला. यंदाच्या वर्षी रेणुका रेवप्पा आयदळे या चार वर्षाच्या चिमुकलीचा नवस फेडण्यासाठी तिचे वडील रेवप्पा आयदळे हे सोलापुरवरून तुळजापूरला चालत जात आहेत. ते कर्नाटक राज्यातील मरगुर या छोट्याशा गावातून आलेले आहेत. रेवप्पा आयदळे यांनी NEWS 18 लोकमतशी बोलतांना सांगितले की, आम्ही देवीचा डोंगर गुडघ्यावर बसून चढणार आहोत. रेणुकाचे भविष्य आणि शिक्षण हे व्यवस्थित पूर्ण व्हावे आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावी अशी मंगल कामना श्री आई तुळजाभवानी देवीकडे करणार आहोत. रेणुका देखील यावेळी आई-वडिलांसोबत पायीच प्रवास करत असल्याचं त्यांनी सांगितले. हेही वाचा :  Dasara 2022 : सोलापूरच्या देवीचे पाकिस्तान कनेक्शन, आजही जपलाय ठेवा! Video श्री आई तुळजाभवानी देवी बद्दल आपली श्रद्धा कायम ठेवत कर्नाटकावरून आलेले तम्मा बिराजदार हे 72 वर्षाचे आजोबा यंदाच्या वर्षी  तुळजापूरला पायी जात आहेत. त्यांचे पायी जाण्याचे हे 25 वे वर्षे आहे. तम्मा बिराजदार सांगतात की, देवीचा अशिर्वाद आणि श्रध्दा कायम आहे म्हणून मला आजवर देवीची सेवा करता आली. तसेच आम्ही कोरोनाकाळात देवीची घरीच मनोभावे पुजा केली. पण आता कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे आम्ही पायी  तुळजापूरला जात आहोत. प्रदूषणाच्या प्रश्नावर ‘गो ग्रीन’चं उत्तर, महिलांच्या स्टार्टअपला नाशिककरांचा प्रतिसाद, Video भाविक का पायी जात असतात? राक्षसाचा वध करण्यासाठी देवी सोलापुरहुन पुढे या मार्गाने मार्गस्थ झाली, अशी आख्यायिका येथे सांगण्यात येते. म्हणून सोलापूर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशा मधून सर्व छोट्या मोठ्या गावातील भाविक हे श्रद्धेने श्री आई तुळजाभवानी देवीचा गजर करत पायी चालत जात असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात