मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पत्नी, मुले असतानाही त्या महिलेशी संबंध का ठेवतोस, विचारल्यावर मोठ्या भावासोबतच भयानक कांड

पत्नी, मुले असतानाही त्या महिलेशी संबंध का ठेवतोस, विचारल्यावर मोठ्या भावासोबतच भयानक कांड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून भावासोबत भयानक कांड घडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  Khushalkant Dusane

अमरावती, 2 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दररोज, हत्येच्या, बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुले असताना शेजारच्या गावातील महिलेशी अनैतिक संबंध का ठेवतोस, अशी विचारणा मोठ्या भावाने केली. यानंतर अशी विचारणा केल्यावर मोठ्या भावाच्या छातीत चाकू भोसकून धाकट्याने त्याला संपविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना धारणी तालुक्यातील हरिसाल येथे बुधवारी रात्री उशिराच्या सुमारास घडली. अनिल शिवनाथ चव्हाण (वय 32, रा. हरिसाल) असे मृताचे नाव आहे. तर सुनील शिवनाथ चव्हाण (वय 30, रा. हरिसाल) असे आरोपीचे नाव आहे.

अनिल आणि सुनील हे दोन्ही भाऊ हरिसाल येथे एकत्र कुटुंबात राहत होते. सुनीलला पत्नी व चार मुले आहेत. मात्र, असे असतानाही नजीकच्या गावातील एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. हे संबंध तोडून संसाराकडे लक्ष देण्याबाबत अनिलसह त्याचे आई-वडीलदेखील वारंवार बजावत होते. मात्र, तरीसुद्धा सुनील त्यांना जुमानत नव्हता. इतकेच नव्हे तर तो काही दिवसांपासून घरीदेखील राहत नव्हता. त्यामुळे त्याचे आईवडील हे त्याची पत्नी आणि मुले यांचा सांभाळ करीत होते.

याचदरम्यान, सुनील हा बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घरी आला. त्याची पत्नी फुलवंती स्वयंपाक करीत होती. याच वेळी मोठा भाऊ अनिलही तेथे आला. यावेळी विवाहबाह्य संबंध तोडून संसाराकडे लक्ष दे, असे अनिलने सुनीलला पुन्हा बजावले. मात्र, यावेळी संतापलेल्या सुनीलने त्याच्याशी वाद घातला आणि याच वादाचे रुपांतर भयानक घटनेत घडले. सुनीलने खिशातून धारदार चाकू काढून अनिलच्या छातीत भोसकला आणि तेथून पळ काढला. यावादात सुनीलची पत्नी फुलवंतीही जखमी झाली.

हेही वाचा - पत्नीच्या त्रासाला इतका कंटाळला की उचललं टोकाचं पाऊल; आधी व्हिडिओ बनवला अन् मग...

दुर्दैवाने रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अनिलचा जागीच मृत्यू झाला. यानंतर काका अमरनाथ चव्हाण आणि मो. सलीम अब्दुल कादर यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक सुयोग महापुरे, कर्मचारी योगेश राखोंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अंजनगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, सुनीलच्या पत्नी फुलवंतीनेच याप्रकरणी सुनीलची पोलिसात तक्रार दिली आहे. यावरुन यामुळे धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फुलवंती आणि शेजारच्या महिलेची चौकशी करून जबाब नोंदवण्यात आला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Amravati, Crime news, Murder