नागपूर, 17 जून, उदय तिमांडे : अखेर काँग्रेसचे निष्कासित नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आले होते, त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ‘सुबह का भुला शाम को वापस आये तो उसे भूला नही कहते’ अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना आशिष देशमुख यांनी दिली आहे. झालेल्या चुकांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, मला भाजपमध्ये पुन्हा येताना आनंद होत असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले देशमुख? ‘सुबह का भुला शाम को वापस आये तो उसे भूला नही कहते’ झालेल्या चुकांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, मला भाजपमध्ये पुन्हा येताना आनंद होत आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कॉल लावला तर कॉल लगात नव्हता, त्यांचे कॉल मला येत नव्हते. मी इतका वाईट नाही की काँग्रेसने मला निष्कासित केलं. मी ओबीसीची बिनशर्त माफी मागावी इतकीच मागणी केली होती. या आधीही राफेल प्रकरणात त्यांनी माफी मागितली होती. काँग्रेस आणि गांधी परिवार ओबीसी विरोधी आहेत. मंडल कमिशनला त्यांनी विरोध केला होता. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर आज त्यांची खासदारकी गेली नसती, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीला टोला यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फेसबुक लाईव्ह सोडलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीही विदर्भात दिसले नाहीत, काँग्रेस आता म्हतारी झाली आहे. जीर्ण झाली आहे. परफॉर्मन्स राहिला नाही. या उलट भाजपमध्ये पारिवारिक वातावरण आहे. मी अडचणीत होतो तेव्हा भाजप नेत्यांनी मदत केली. काँग्रेसनं मला बाहेर काढलं ते बरं झालं त्यामुळे मी भाजपसारख्या विचारधारेच्या पक्षात येऊ शकलो असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
Breaking news : ठाकरे गटाला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात, आज पक्षप्रवेशदरम्यान मी 2024 ची कुठलीही निवडणूक लढवणार नाही, ओबीसी आणि विदर्भासाठी काम करेल. काटोलमधील काकागिरी, सावनेर मधील दादागिरी आणि विदर्भातील नानागिरी संपविण्याचं काम करेल. भाजप जो उमेदवार देईल त्याला जिकूंन आणण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न केरेल असं देशमुख यांनी म्हटलं आहे.