मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : निसर्गरम्य वातावरणात घ्या झटका मिसळचा आस्वाद, पाहा VIDEO

Nashik : निसर्गरम्य वातावरणात घ्या झटका मिसळचा आस्वाद, पाहा VIDEO

नाशिकमध्ये मिसळची अनेक फेमस ठिकाणं आहेत. त्याच पैकी एक ग्रेप एम्बसी (Grape Embassy) झटका मिसळ आहे. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात मिसळचा आस्वाद घेता येतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक 24 ऑगस्ट : नाशिककरांचे आणि मिसळचे एक अतूट नाते आहे. तर्रीबाज, ठसकेबाज, चमचमीत मिसळ ही इथली खासियत आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसळ प्रेमी आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये मिसळची अनेक फेमस ठिकाणं आहेत. त्याच पैकी एक ग्रेप एम्बसी (Grape Embassy) झटका मिसळ आहे. अवघ्या काही दिवसात खवय्यांच्या पसंतीस येथील मिसळ उतरली आहे. त्याच कारण म्हणजे निसर्गरम्य वातावरणात द्राक्ष बागेत बसून मिसळचा आस्वाद घेता येतो.

सुरेखा संधान (Surekha Sandhan) आणि ज्योती पिंगळे (Jyoti Pingale) या नणंद भावजयीने एकत्रित येत दीड वर्षांपूर्वी आपल्या शेतात गंगापूररोड जवळ सुयोजीत गार्डन शेजारी ग्रेप एम्बसी झटका मिसळ नावाने सुरू केली. कारण नाशिकमध्ये मिसळ गल्लोगल्ली भेटते. त्यामुळे आपल वेगळेपण हवं म्हणून त्यांनी द्राक्ष बागेत मिसळ सुरू केली. अवती भोवती झाडे, निसर्गरम्य वातावरण आणि त्यात मिसळ खाण्याचा आनंद खवय्यांना येथे काही औरच वाटतो. लाल पिवळ्या, रंगांच्या छत्र्या लहान मुलांना आकर्षित करतात. मुलांना खेळायला वेगवेगळी खेळणी असल्यामुळे मुले ही येथे रंगून जातात. दररोज मोठ्या प्रमाणात खवय्ये या ठिकाणीहजेरी लावतात. लाखोंच्या घरात त्यांना या मिसळ व्यवसायातून नफा ही मिळतोय.

हेही वाचा : Nashik : नाशिक जिल्ह्यात घ्या केदारनाथचा अनुभव, अंजनेरी पर्वतरांगेत साकारलंय हुबेहुब मंदिर, पाहा VIDEO

नणंद भावजयीच्या हातची चवच भन्नाट

एकदा मिसळ खाल्ली की खवय्ये पुन्हा पुन्हा मिसळ खायला या ठिकाणी येतात. मिसळमध्ये सर्व घरगुती मसाले वापरले जातात. बाहेरून काहीही आणले जात नाही. मिसळ खाल्ल्यामुळे कोणालाही पोटाचा त्रास होत नाही. लहान मुले तर हौसेने खातात. सुरेखा संधान आणि ज्योती पिंगळे या स्वतः मिसळ तयार करतात.

एका प्लेट मध्ये फुल टू धमाल

एका प्लेट मध्ये मिसळ दोन पाव,कांदा निंबू,दहीवाटी,मनुके,पापड,असतो. वरतून तरीचा रस्सा,साधा रस्सा असतो. द्राक्षांचा सीजन असला तर ज्यूस देखील असतो. एका प्लेटची किंमत 100 रुपये आहे. मात्र मिसळची टेस्ट आणि निसर्गरम्य वातावरण बघता खवय्ये या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी पसंदी देतात.

हेही वाचा : Nashik: नोकरी मिळाली नाही म्हणून सुरू केला व्यवसाय; विद्यार्थ्यांची सुटली अडचण, VIDEO

अंध,अपंग आणि सैनिकांसाठी खास सूट

संधान आणि पिंगळे कुटुंब आपल्या व्यवसायाबरोबरच समाजसेवा ही जपत आहे. या ठिकाणी अंध लोकांसाठी मिसळ मोफत आहे. तर सैन्य आणि अपंग लोकांसाठी 50% सूट आहे. त्यामुळे हा निर्णय देखील त्यांचा कौतुकास्पद आहे.

 मिसळ पत्ता 

गंगापूररोड जवळील सूयोजित ब्रीज शेजारी, मखमलाबाद रोडला ही मिसळ आहे. अधिक माहितीसाठी प्रतिक संधान मो नं : 917387127200

नाशिकची ही मिसळ खूपच छान आहे. टेस्ट तर भन्नाट आहेच. मात्र, या ठिकाणचेवातावरण देखील सुंदर आहे. मी कणकवली वरून फक्त मिसळ खाण्यासाठी आली आहे. मी नेट वर बघितल होत मिसळ छान आहे. द्राक्ष बागेत आहे. त्यामुळे मी या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी आले. पण या ठिकाणचे निसर्गरम्य वातावरण बघून भारावून गेले. फोटोशूटसाठी अप्रतिम आहे, अशी प्रतिक्रिया ग्राहक कोमल मोहिते यांनी दिली आहे.

हटके करण्याचा प्रयत्न केला आणि ग्राहक आकर्षित झाले

व्यवसायात यश अपयश हे येतच असत. मात्र आपण आपल्या कामात सातत्य ठेवण गरजेचे असते. मिसळ सुरू केली तेव्हा वाटल नव्हत इतका ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल . मात्र खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही इतरांपेक्षा वेगळ देण्याचा प्रयत्न केला. द्राक्ष बागेत मिसळ सुरू केली. तीच खवय्यांना भावली, अशी प्रतिक्रिया व्यावसायिक सुरेखा संधान यांनी दिली आहे.

आम्ही दोघी महिलांनी एकत्रित व्यवसाय सुरू केला. आमच्या ही हाताला काम नव्हत शेतीत काय परिस्थिती असते हे तुम्हाला माहीत आहे. मात्र आम्ही विचार केला आपण व्यवसाय करू आणि आम्ही मिसळचा व्यवसाय सुरू केला. आज आम्ही या व्यवसायात यशस्वी झालो अडचणी आल्या पण घाबरलो नाही. व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे काही करा कामात सातत्य ठेवा हतबल होऊ नका नक्की एक दिवस यश मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यवसायिक ज्योती पिंगळे यांनी दिली आहे.

First published:

Tags: Food, Local18, Local18 food, Nashik