जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूरकरांनो दिवाळीसाठी घरात चिवडा करूच नका, विष्णू मनोहरांनी करून ठेवलीये सोय

नागपूरकरांनो दिवाळीसाठी घरात चिवडा करूच नका, विष्णू मनोहरांनी करून ठेवलीये सोय

नागपूरकरांनो दिवाळीसाठी घरात चिवडा करूच नका, विष्णू मनोहरांनी करून ठेवलीये सोय

चिवड्याचा हा उपक्रम एक जागतिक विक्रम असेल.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 9 ऑक्टोबर : नुकताच दसरा झाला. यानंतर आता दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की, सर्वात आधी फराळ आठवतो. लाडू, चिवडा आणि बरंच काही. यात आता नागपूरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये सर्वांना मोफत चिवडा वाटला जाणार आहे. नेमकं काय होणार - जागतिक अन्न दिनानिमित्त नागपूरमध्ये एकाच कढईमध्ये एकाचवेळी 6 हजार किलो चिवडा तयार केला जाणार आहे. तसेच हा चिवडा फ्रीमध्ये सर्वांना वाटला जाणार आहे. कदाचित देशातील याप्रकारचे असे हे पहिलेच आयोजन आहे. 16 ऑक्टोबरला हे आयोजन होणार आहे. जागतिक अन्न दिनानिमित्त एका कढईत एकूण ६ हजार किलो चिवडा तयार केला जाणार आहे. याठिकाणी चिवडा बनवण्यापूर्वी सुमारे दीडशे ते अडीचशे लोक तयारीला जमणार आहेत. मराठी खाद्य विश्वातील लोकप्रिय शेफ, विष्णू मनोहर चिवडा बनवणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, चिवडा शिजवल्यानंतर अर्धा किलो चिवड्याच्या पाकिटात मोफत वाटला जाणार आहे. सुमारे 12 हजार कुटुंबांसाठी विनामूल्य चिवडा वाटला जाणार आहे. हेही वाचा -  Video : कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात असतो भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा विष्णू मनोहर यांनी NEWS 18 सोबत बोलताना सांगितले की, पोह्यांचा चिवडा ही खूप चांगली रेसिपी आहे. दुसऱ्या चिवड्यांच्या तुलनेत पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी पसंद केला जातो. चिवड्याचा हा उपक्रम एक जागतिक विक्रम असेल. तसेच नागपूरवासियांना ही दिवाळीची भेट असेल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात