Home /News /maharashtra /

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींना वीज बिलाचा शॉक; वीज बिल न भरल्याने 200 ग्रामपंचायतींचे पथदिवे बंद, अनेक गावे अंधारात

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींना वीज बिलाचा शॉक; वीज बिल न भरल्याने 200 ग्रामपंचायतींचे पथदिवे बंद, अनेक गावे अंधारात

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात 200ग्रामपंचायतींना वीज बिलाचा शॉक; वीज बिल न भरल्याने अनेक गावे अंधारात

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात 200ग्रामपंचायतींना वीज बिलाचा शॉक; वीज बिल न भरल्याने अनेक गावे अंधारात

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याच जिल्ह्यातील तब्बल 200 ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. वीज बिल न भरल्याने पथदिव्यांची वीज कापण्यात आली आहे.

नागपूर, 4 जून : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या नागपूर जिल्ह्यातील (Nagpur district) तब्बल 200 ग्रामपंचायती रात्री अंधारात गेल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायती अंधारात गेल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने महावितरणने वीज कापली (Around 200 gram panchayat street light power cut) आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावे रात्री अंधारात गेले आहेत. राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार, ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटच्या बिलाचे अनुदान राज्य सरकार थेट जिल्हा परिषदला देणार आहे. जिल्हा परिषदा ते अनुदान पंचायत समिती मार्फत महावितरणकडे करणार आहे. आधी हे अनुदान थेट महावितरणला देण्यात येत होते. त्यामुळे आता महावितरणकडे स्ट्रीट लाईट बिलाचे पैसे जमा न झाल्याने महावितरणने सरसकट जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची वीज कट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे अनेक सरपंचांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारे ग्रामीण भाग अंधारात गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती आहे तर ऊर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल असा सवालही विचारण्यात येत आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणाची कारवाई राज्यात कोळशाच्या अभावी गेल्या दोन महिन्यांत मोठं वीज संकट उभं राहिलं होतं. या संकट काळात महावितरणने वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. महावितरणानं एप्रिल महन्यात 15 दिवसांत 46 हजार 500 आकडे काढले. सगळ्यात जास्त मराठवाड्यात आकडे टाकून वीजचोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे सगळ्यात मोठा आकडा हा जवळपास 1000 फुटांचा आढळून आला आहे. या कारवाईनंतर महावितरणानं सुमारे 500 मेगावॅटची चोरी थांबवली आहे. राज्यातील विजेची रोजची सरासरी मागणी 24 हजार मेगावॅट इतकी आहे. वाचा : हॉटेलमध्ये जेवले मग बाहेर येऊन तरुणाला संपवले, हत्येचा खळबळजनक VIDEO आला समोर महाराष्ट्राला 'स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड' 'स्कॉट स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट' 2021 मध्ये महाराष्ट्राने ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. 'इंडिया गव्हर्नन्स फोरम'चा एक भाग म्हणून 18 जून 2022 रोजी दिल्लीत होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राल 'स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Electricity bill, Electricity cut, Nagpur, Nitin raut

पुढील बातम्या