मुंबई, 30 एप्रिल: देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांतील कोळसा साठा झपाट्यानं कमी होऊ लागल्याने शुक्रवारी भारनियमनाचे संकट आणखी गडद झाले. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडूसह अनेक राज्यांनी केंद्राकडे तातडीने कोळशाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. अशातच महावितरणानं मोठा कारवाई केली आहे. आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणानं कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणानं 15 दिवसांत 46 हजार 500 आकडे काढले. सगळ्यात जास्त मराठवाड्यात आकडे टाकून वीजचोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे सगळ्यात मोठा आकडा हा जवळपास 1000 फुटांचा आढळून आला आहे. या कारवाईनंतर महावितरणानं सुमारे 500 मेगावॅटची चोरी थांबवली आहे. राज्यातील विजेची रोजची सरासरी मागणी 24 हजार मेगावॅट इतकी आहे. विजेची रेकॉर्डब्रेक मागणी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे आहे, अशा स्थितीत अनेक ठिकाणी केवळ सात ते आठ तास वीज मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी 14:50 वाजता संपूर्ण भारतातील विजेची मागणी 20,7111 MW वर पोहोचली आहे. जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे. पॉवर प्लांट्समधील कोळशाचा साठा कमी होत असल्याच्या वृत्तांदरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, देशातील प्रकल्पांमध्ये सुमारे 22 दशलक्ष टन कोळसा आहे, जो 10 दिवस पुरेसा आहे आणि तो सतत भरला जाईल. महाराष्ट्रातील स्थिती वीज संकटाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला 25 हजार मेगावॅट विजेची गरज आहे, त्या तुलनेत राज्याला केवळ 21 ते 22 हजार मेगावॅट वीज मिळत आहे. राज्य सरकारने अदानी पॉवर (APML) आणि JSW पॉवरला केंद्रीय विद्युत कायदा आणि MERC कायद्याअंतर्गत नोटिसा पाठवल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली असून, त्याविरोधात नागपुरात लोकांनी कंदील घेऊन आंदोलन केले. वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. 657 पॅसेंजर ट्रेन रद्द दरम्यान, यूपीमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 657 प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. औष्णिक वीज केंद्रांसाठी पुरवल्या जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा आणि कोळसा वेळेवर पोहोचता यावा यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.