मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरी परतणाऱ्या 2 शेतकऱ्यांवर पडली वीज, मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी, विदर्भामध्ये एकाच दिवस 6 जणांचा मृत्यू

घरी परतणाऱ्या 2 शेतकऱ्यांवर पडली वीज, मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी, विदर्भामध्ये एकाच दिवस 6 जणांचा मृत्यू

 सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे रेंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली.

सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे रेंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली.

सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे रेंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 12 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने (maharashtra rain) धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये विदर्भात वीज पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाला. यात नागपूर (nagpur) जिल्ह्यातील दोघांचा तर चंद्रपूर जिल्ह्यामधील तीन आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. बैलगाडीवर घरी परतणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर वीज पडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

विदर्भामध्ये पावसाने धुमसान घातले आहे. रविवारी दिवसभर संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मांगली गावातील सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे रेंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

(Weather Updates: पुण्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; राज्यभरात धो-धो कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट)

गुंडेराव यांचा मृतदेह चालत्या रेंगी मधून खाली कोसळला. तर सोमेश्वर पोपटकर यांचा मृतदेह रेंगीवर अडकून राहिला. वीज कोसळल्याची बैलांना कल्पना नव्हती त्यामुळे बैलगाडी मालकाचा मृतदेह घेऊन थेट घरी पोहोचले. तेव्हा वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांना कळली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तलावावर आंघोळीला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

दरम्यान, गावालगतच्या मालगुजारी तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चकारा येथे उघडकीस आली आहे. भारत ओमप्रकाश पाठक वय 15 वर्ष रा. चकारा असे मृताचे नाव आहे. ओमप्रकाश अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवनचा नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती, आजीने सकाळी त्याला जेवण करायला सांगितले. मात्र, बाहेर जाऊन लवकर येतो असे म्हणून तो घरून निघून गेला.

(महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, औरंगाबाद-सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस, कोल्हापुरातही कहर, निसर्गाच्या रौद्ररुपाचे भयंकर VIDEO समोर)

त्यानंतर सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर सायकल, कपडे व चपला दिसून आल्या. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबधित घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली असून सौंदड येथील मासेमारांना शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

First published:
top videos