नागपूर, 17 जून- नागपूर महापालिकेच्या 20 जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, दुसरीकडे सभा घेण्यावर महापौर संदीप जोशी ठाम आहेत. या मुद्यावर सत्ताधारी भाजपविरुद्ध आयुक्त असा वाद पुन्हा पेटला आहे. हेही वाचा.. सुशांत सिंह आणि दिशाची एका पाठोपाठ आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर! राज्यात आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असा दावा महापौरांनी केल्याने खळबळ उडाली आहे. शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला महापालिका प्रशासनच जबाबदार आहेत. क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले, असा गंभीर आरोप संदीप जोशी यांनी केला. सभा रद्द करणार नाही- महापौर… महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या 20 जूनला घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र महापौरांनी 11 जून रोजी आयुक्तांना दिले होते. त्यावर १२ जूनला आयुक्तांनी सभा घेण्यास सहमती दर्शवली होती. मात्र 15 जूनला आयुक्तांनी महापौरांना पत्र पाठवून कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि सभा स्थळ प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्यामुळे सर्वसाधारण सभा घेता येणार नाही, असे कळवले होते. पण सभा रद्द करायला आता महापौर यांनी आक्षेप घेतला आहे. आयुक्तांना थेट निशाणा.. नागपुरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. सध्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1100 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरलं आहे. क्वॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहे, असा घणाघाती आरोप महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केला आहे. **हेही वाचा..** मास्क लावल्यानंतरही होतोय कोरोनाचा प्रसार, ही चूक पडतेय महागात; संशोधकांचा दावा ते भोगत आहेत परिणाम.. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत संदीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीत भाजपला कोणतेही स्वारस्य नाही, ज्यांनी मुंढेंना नागपुरात आणलं, तेच लोक लोक आता त्याचे परिणाम भोगत आहेत. आमची राज्यात सत्ता असती तर तुकाराम मुंढे नागपुरात नसते, असंही महापौर संदीप जोशी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.