...दोन दिवसांचा वेळ देतो, तुकाराम मुंढेंनी खासगी हॉस्पिटलला दिला अल्टिमेटम

...दोन दिवसांचा वेळ देतो, तुकाराम मुंढेंनी खासगी हॉस्पिटलला दिला अल्टिमेटम

नागपूरमध्ये कोरोनाच्या काळात खासगी हॉस्पिटल्सनी जास्त रक्कम आकारू नये, अशी सूचना प्रशासनाने केली होती.

  • Share this:

नागपूर, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून खासगी हॉस्पिटलना सूचना करण्यात आली होती. पण, नागपूरमधील काही हॉस्पिटलनी याही परिस्थितीत संधी साधल्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच दणका दिली आहे.

नागपूरमध्ये कोरोनाच्या काळात खासगी हॉस्पिटल्सनी जास्त रक्कम आकारू नये, अशी सूचना प्रशासनाने केली होती. पण तरीही कोविड-19  ची बाधा झालेल्या रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली गेली. या प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुरातील वोक्हार्ट आणि सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु,  समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत.

यासाठी या हॉस्पिटल्सना दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. जर संबंधित वेळेत रुग्णांची रक्कम रुग्णालय व्यवस्थापनाने परत केली नाही तर हॉस्पिटलविरोधात महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा कायदा,अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंढे यांनी दिला आहे.

याशिवाय कोविड कालावधीत नॉन कोविड रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्कासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली असून, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या 991  रुग्णांपैकी 304 रुग्णाचे बिल मनपाच्या पथकाला प्राप्त झाले आहे. सर्व 687 रुग्णांचे बिल अद्याप उपलब्ध केलेले नाही.

त्यामुळे नॉन कोविड रुग्णांकडून वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम तात्काळ परत करण्यात यावी आणि अन्य माहिती दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

Published by: sachin Salve
First published: August 12, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading