रायगड, 01 जून: रायगड (Raigad) जिल्ह्यातील नवीन पनवेल शहरातील विमानतळाच्या जागेत काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह (Dead body Found) आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मृत तरुणीची ओळख पटवून हत्येचं गूढ उलगडलं आहे. मृत तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकर तरुणाने केटामाईन (boyfriend killed girlfriend by injecting ketamine) नावाचं इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक (Boyfriend Arrest) केली असून न्यायालयाने त्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधित 35 वर्षीय आरोपीचं नाव चंद्रकांत गायकर असून तो एका नवीन पनवेल शहरातील एका खाजगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. त्याचे मागील काही दिवसांपासून मृत तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान मृत तरुणीने आरोपी गायकर याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे दोघांत सातत्याने खटके उडू लागले. त्यामुळे आरोपी प्रियकराने तिच्या हत्येचा कट रचला. त्याने हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून तिची केटामाईन इंजेक्शन देऊन हत्या केली.
त्यानंतर आरोपी प्रियकराने तिचा मृतदेह नवीन पनवेल शहरातील विमानतळाच्या जागेत असणार दत्त मंदिराजवळील एका रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला. 29 मे रोजी रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात केली. यावेळी हा मृतदेह नानोशी येथील रमेश ठोंबरे यांच्या बहिणीचा असल्याची माहिती समोर आली.
हे वाचा-विवाहित प्रियकराने अपहरण करून काढला प्रेयसीचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर
याप्रकरणी पोलिसांनी रमेशची चौकशी केली असता, आपल्या बहिणीचे वॉर्डबॉय चंद्रकांत गायकर याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याची माहितीही रमेशने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी वॉर्डबॉय गायकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. केटामाईन इंजेक्शन देऊन हत्या केल्याचंही त्याने यावेळी सांगितलं आहे. आरोपी गायकर सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Murder Mystery, Raigad news