नागपूर, 03 जून : पैशांच्या देवाणघेवणीतून निर्माण झालेल्या वादातून तलवारीने वार करून 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. राजू शीतल कश्यप असं मृताचे तर वीरेंद्र कल्लू नायक असं अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यातील इतर सहा आरोपी अद्याप फरार आहेत. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कांद्री शिवारात सोमवारी रात्री 11वाजेच्या सुमारास इंडियन बँक ऑफ इंडियासमोर घडली. घटनेनंतर जखमी झालेल्या राजू कश्यप याला नागरिकांनी रुग्णालयात नेत असताना अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात असलेल्या आरोपींची गुन्हेगारी जगतातील पार्श्वभूमी असून प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी तिघास अटक करण्यात आली. हेही वाचा - मोठी बातमी! ‘निसर्ग’ वादळानं घेतलं रौद्र रूप, आता कुठल्याही क्षणी होणार लँडफॉल राजू कश्यप हा वेकोलि कोळसा खाणअंतर्गत येणाऱ्या लोकेश जैन या कंत्राट कंपनीमध्ये काम करत होता. आरोपी वीरेंद कल्लू नायक आणि त्याच्या साथीदाराची पैशाच्या देवाणघेवणीवरून राजू कश्यपसोबत वाद होते. सोमवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. राजू कश्यप आपल्या सहकाऱ्यासोबत सोमवारी रात्री दुचाकीवरुन घरी येत होता. त्याचवेळी इंडियन बँक ऑफ इंडियासमोर आरोपी वींरेंद्र कल्लूने त्याची दुचाकी अडवली आणि चाकू, तलवारीने हल्ला केला. यात राजू राजू कश्यप गंभीर जखमी झाला. राजू कश्यप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. त्याच्यासोबत असलेल्या अकरम खान या मित्राने नागरिकांची मदत घेऊन राजूला जवाहरलाल नेहरू रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर कामठी इथं हलवण्यात आलं होतं. पण, अतिरक्तस्त्रव झाल्यामुळे राजूचा वाटेतच मृत्यू झाला. **हेही वाचा -** धोका दिल्याचा घेतला बदला, गर्भवती पत्नीकडून पतीवर कुऱ्हाडीनं सपासप वार या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. मृत राजूचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी वीरेंद्र कल्लूला अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







